शहरं
Join us  
Trending Stories
1
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
2
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
3
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
4
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
5
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
6
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
8
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
9
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
10
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
11
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
12
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
13
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
14
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
15
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
16
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
17
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
18
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
19
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
20
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका

UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 7:44 PM

'पाणी आपले, क्षेत्र आपले, धरणही आपले...पण काँग्रेसला पाकिस्तानच्या नाराजीची भीती.'

JP Nadda in Jammu-Kashmir :जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले आहे. या निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय स्तरावरचे अनेक नेते राज्यात जोरदार प्रचार करत आहेत. दरम्यान, आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी बरनाईमध्ये प्रचारसभेत शाहपूरकंडी प्रकल्पाचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार टीका केली.

निवडणूक रॅलीला संबोधित करताना नड्डा म्हणाले की, यूपीए सरकारने पाकिस्तान नाराज होईल, या भीतीने शाहपूरकंडी प्रकल्पाला कधीच हात लावला नाही. पाणी आपले, क्षेत्र आपले, धरणही आपले...पण काँग्रेसला पाकिस्तानच्या नाराजीची भीती. देशात मोदी सरकार आल्यानंतर शाहपूरकंडी प्रकल्पाचे काम सुरू झाले आणि आज तो प्रकल्प पूर्णही झाला आहे. या प्रकल्पामुळे जम्मूच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवण्याचे काम केले जात आहे. यामुळे हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. 

तीन कुटुंबांनी राज्याचे मोठे नुकसान केलेनड्डा पुढे म्हणतात, व्यापाराच्या नावाखाली एलओसीवरुन दहशतवाद येतो, हे माहीत असूनही काँग्रेस-एनसीने पुन्हा व्यापार सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी प्रमाणपत्र दिले आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री म्हणतात की, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस भारतात आमचा अजेंडा चालवत आहेत. यावरुन त्यांचे पाकिस्तानप्रेम दिसून येते. या अब्दुल्ला, मुफ्ती आणि नेहरू-गांधी कुटुंबाने काश्मीरचे खूप नुकसान केले. या घराण्यांनी भ्रष्टाचाराच्या सीमा पार केल्या. 1990 चे दिवस पुन्हा यावेत, असे त्यांना वाटते, अशी टीकाही नड्डांनी केली.

'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...

ही निवडणूक कोणा एका व्यक्तीची नाहीही निवडणूक जम्मू-काश्मीरच्या स्थैर्याची आणि देशाला बळकट करण्यासाठी आहे. त्यामुळे देशाला कमकुवत करणाऱ्या शक्तींना आपण चोख प्रत्युत्तर देऊ. काँग्रेस सत्तेत असताना जातिवाद, जातीयवाद, घराणेशाही, भ्रष्टाचार, तुष्टीकरणाचे राजकारण, फूट पाडा आणि राज्य करा असे मुद्दे गाजत होते. पंतप्रधान मोदींनी राजकारणाची संस्कृती आणि व्याख्या बदलून टाकली आहे. 2014 मध्ये जेव्हा मोदीजींनी पदभार स्वीकारला तेव्हा ते लोकाभिमुख राजकारण, जबाबदार प्रशासन, प्रतिसादात्मक सरकार आणि कामगिरीवर आधारित राजकारणाची सुरुवात झाली.

राज्यात G20चे आयोजनजम्मू-काश्मीरमध्ये G20 चे आयोजन करण्यात आले होते, जगभरातून नेते राज्यात आले. यापूर्वी असा कार्यक्रम झाला असता तर तो फक्त दिल्लीपुरता मर्यादित राहिला असता, पण मोदीजींनी G20 ला राष्ट्रीय कार्यक्रम बनवले. श्रीनगरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र G20 बैठका झाल्या आणि जगभरातून लोक देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले, असेही जेपी नड्डा यावेळी म्हणाले.

जेपी नड्डांची आश्वासनेराज्यात आमचे सरकार आल्यावर पीएम-किसान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना मिळणारी 6,000 रुपयांची वार्षिक मदत 10,000 रुपये केली जाईल. पंडित प्रेमनाथ डोगरा योजनेंतर्गत आम्ही 5 लाख तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करणार आहोत. भूमिहीनांना अटल आवास योजनेंतर्गत 5 मरला जमीन मोफत दिली जाणार आहे. राज्यातील मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी आणि पुनरुज्जीवनासाठी आर्थिक मदत केली जाईल, असे आश्वासन नड्डांनी यावेळी दिले.

शाहपूरकंडी प्रकल्प काय आहे?शाहपूरकंडी धरण प्रकल्प भारताच्या पंजाब राज्यातील पठाणकोट जिल्ह्यातील रावी नदीवर आहे. शाहपूरकंडी धरणाच्या उभारणीसाठी पंजाब आणि जम्मू-काश्मीर यांच्यात जानेवारी 1979 मध्ये द्विपक्षीय करार झाला, पण प्रस्तावित प्रकल्प प्रत्यक्षात आला नाही. या प्रकल्पाची पायाभरणी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सन 1982 मध्ये केली होती, मात्र यूपीए सरकारच्या काळात हे धरण बांधता आले नाही. या धरणाचे काम मोदी सरकारच्या काळात (2018) सुरू झाले आणि आता ते पूर्ण झाले आहे.

 

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपाcongressकाँग्रेस