संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचा आज शेवटचा कामकाजाचा दिवस आहे. वक्फ विधेयकाचा विचार करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीचा म्हणजेच जेपीसीचा अहवाल आज राज्यसभेत मांडण्यात आला. अहवाल सादर होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेत गोंधळ करण्यास सुरुवात केली. गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.
सभापती जगदंबिका पाल यांनी विधेयकाशी संबंधित अहवाल आणि पुराव्यांचे रेकॉर्ड सभागृहाच्या टेबलावर ठेवले. यावेळी लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
दिल्लीत शिंदेंच्या मंत्र्यांकडे ठाकरेंचे ३ खासदार स्नेह भोजनाला, आदित्य ठाकरे म्हणाले...
आज संसदेत आयकर विधेयक २०२५ देखील सादर केले जाणार आहे. हे विधेयक प्राप्तिकर तरतुदी सोप्या पद्धतीने सादर करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या विधेयकात, 'आकलन वर्ष' सारख्या गुंतागुंतीच्या शब्दावलीऐवजी 'कर वर्ष' ही संकल्पना आणण्यात आली आहे.
जेपी नड्डा म्हणाले की, विरोधी खासदार तुष्टीकरणाचे राजकारण करत आहेत. विरोधकांना जेपीसी अहवालावर चर्चा करायची नाही. विरोधी खासदारांच्या आरोपांना उत्तर देताना किरेन रिजिजू म्हणाले की, या विधेयकात सर्व गोष्टी आहेत. काहीही हटवलेले नाही.विरोधकांनी सभागृहाची दिशाभूल करू नये. नियमांनुसार अहवाल तयार करण्यात आला आहे. विरोधकांचे सर्व आरोप खोटे आहेत, असंही ते म्हणाले.
या विधेयकावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी टीका केली. खरगे म्हणाले, हा अहवाल पुन्हा एकदा जेपीसीकडे पाठवावा. जेपी नड्डा यांनी हे पाऊल उचलले पाहिजे. आमच्या मतांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे खरगे म्हणाले. आम्ही असा बनावट अहवाल स्वीकारणार नाही, असंही खरगे म्हणाले.
विरोधकांचा दोन्ही सभागृहात गोंधळ
विरोधकांनी केलेल्या गोंधळावर नाराजी व्यक्त करताना जेपी नड्डा म्हणाले की, विरोधी खासदारांचे वर्तन बेजबाबदार आहे.वक्फ विधेयकाचा विचार करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीचा अहवाल दोन्ही सभागृहात सादर करण्यात आला. अहवाल सादर झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी दोन्ही सभागृहात गोंधळ घातला.