ऑनलाइन लोकमतकोलकाता, दि. 20 - सामान्य घरातल्या धोब्याचा मुलगा जेएसडब्ल्यू स्टील या कंपनीमध्ये व्हाइस प्रेसिडेंट किंवा उपाध्यक्ष झाला आहे. अरूण लाल या माजी क्रिकेटरच्या घरचे कपडे या मुलाचे वडील इस्त्री करून द्यायचे, पण त्यांच्या बिकाश चौधरी या मुलाने इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलं. अरूण लालची पत्नी बिकाशला इंग्रजी शिकवायची आणि ऑरेंज ज्यूस द्यायची. ऑरेंज ज्यूसच्या आशेनं आपण इंग्रजी शिकलो असं आज चौधरी सांगतात.इंग्रजीच्या शिक्षणापासून अरूण लालच्या कुटुंबाशी जुळलेले संबंध पुढे वाढले. अरूण लालना मुलबाळ नसल्याने त्यांनी बिकाशकडे ममत्वानं लक्ष दिलं आणि करीअर घडवण्यासाठी मदत केली. बिकाशनं बीकॉम मग एमकॉमही केलं आणि नंतर उअळ पास होत आयआयएम कोलकातामध्ये प्रवेश मिळवला.बिकाशना नंतर डॉइश बँकेमध्ये नोकरी मिळाली. मला दोन आई वडील आहेत असं बिकाश अभिमानानं सांगतात, एक ज्यांनी जन्म दिला ते आणि दुसरे लाल पती पत्नी.पुढे जात बिकाशनं अरूण लालच्या कुटुंबाला अर्थसहाय्य केली आणि कृतज्ञताही जपली, ज्यामुळे अरूण लाल फ्लॅटमधून बंगल्यात रहायला जाऊ शकले. कृतज्ञता इथंच संपत नाही, तर त्यांनी आपल्या मुलीचं नाव अरूण लाल यांच्यावरून अरुणिमा असं ठेवलं.बिकाश हा अत्यंत आदर्श मुलगा असल्याचं कौतुक अरूण लाल यांनी केलंय.