संत बाबा गेलाराम यांचा जन्मोत्सव उत्साहात
By admin | Published: March 13, 2016 12:03 AM
जळगाव- अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट, कंवरनगर यांच्यातर्फे संत बाबा गेलाराम साहेब यांचा ८६ वा जन्मोत्सव शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सिंधी बांधवांनी संत बाबा हरदासराम साहेब व संत बाबा गेलाराम साहेब यांची सजीव आरास साकारून बग्गीवरून मिरवणूक काढली.
जळगाव- अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट, कंवरनगर यांच्यातर्फे संत बाबा गेलाराम साहेब यांचा ८६ वा जन्मोत्सव शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सिंधी बांधवांनी संत बाबा हरदासराम साहेब व संत बाबा गेलाराम साहेब यांची सजीव आरास साकारून बग्गीवरून मिरवणूक काढली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमही झाले. पहाटे ५ वाजता संत बाबा हरदासराम साहेब व संत बाबा गेलाराम साहेब यांच्या समाधीवर पंचामृत अर्पण करण्यात येऊन अभिषेक करण्यात आला. यानंतर प्रमुख धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. त्यानंतर सकाळी अखंड धुनी साहेबची समाप्ती करण्यात आली. संत बाबा हरदासराम साहेब व संत बाबा गेलाराम साहेब यांची सजीव आरास साकारण्यात आली. त्यांची बग्गीवरून सकाळी १० वाजता मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत हिंदी प्राथमिक पाठशाळेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले. शेकडो भक्त, सिंधी बांधव या मिरवणुकीत सहभागी झाले. मुलींनी धार्मिक गीतांवर नृत्य सादर केले. संंतांची सजीव आरास असलेली बग्गी मध्यभागी होती. महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती. बीएचआर महिला मंडळाच्यावतीने भजने सादर करण्यात आली. अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टच्या कार्यालयापासून (सेवामंडळ) निघालेली ही मिरवणूक सिंधी कॉलनी परिसरात फिरविण्यात आली. सेवामंडळ येथे समारोप झाला. यानिमित्त ७५ बालकांचा जाऊळचा कार्यक्रम झाला. साई जशनलाल व साई देविदास यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम घेण्यात आला. दुपारी आशिर्वचन झाले. या वेळी ट्रस्टचे राम कटारिया, विषणदास मतानी, हिरानंद मंधवानी, शंकर मेहता, विजय दारा, जगदीश कुकरेजा, हरदयाल कुकरेेजा, सतीश मतानी, कन्हैयालाल कुररेजा, शेखर मोतीरामाणी, अशोक मंधान, भगत बालाणी, राजकुमार आडवाणी, विजय गेही, पंचायतचे राजकुमार वालेचा, जयरामदास कुररेजा, गुरूमुखदास तलरेजा, धन:श्यामदास रावलानी, रेलुराम वालेचा, प्रकाश आडवाणी, दर्शनलाल वालेचा, सुखरामदास मंधवाणी आदी उपस्थित होते. महाप्रसादाची व्यवस्था भक्तांसाठी करण्यात आली होती.