शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

न्यायाधीशांची निवड; सर्वोच्च न्यायालयाने अखेर दिली पारदर्शकतेला बगल

By admin | Published: December 17, 2015 1:07 AM

उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची ‘कॉलेजियम’ पद्धतीने निवड करण्याची सुधारित प्रक्रिया केंद्र सरकारने सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने निश्चित करावी, असा आदेश सर्वोच्च

- अजित गोगटे,  मुंबईउच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची ‘कॉलेजियम’ पद्धतीने निवड करण्याची सुधारित प्रक्रिया केंद्र सरकारने सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने निश्चित करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला खरा पण ही नवी प्रक्रियाही पूर्वीप्रमाणेच गोपनीयतेच्या पडद्यातच गुरफटलेली राहिल याचीही व्यवस्था केली. परिणामी न्यायाधीशपदी नेमण्यासाठी कोणाच्या नावांचा विचार केला जात आहे आणि एखाद्याची निवड का केली किवा का केली गेली नाही, याची कोणतीही माहिती सामान्य जनतेस मिळू शकणार नाही.वरिष्ठ न्यायाधीशांच्या नेमणुकांसाठी राष्ट्रीय न्यायिक निवड आयोग नेमण्याचा कायदा व त्याअनुषंगाने केली गेलेली ९९ वी घटनादुरुस्ती न्या.जगदीशसिंह केहार यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने दोन महिन्यांपूर्वी घटनाबाह्य ठरवून रद्द केली. मात्र त्याच वेळी ‘कॉलेजियम’ची निवड पद्धती अधिक पारदर्शी करण्याची गरजही न्यायालयाने मान्य केली होती.यासाठी नेमके काय करावे यावर न्यायालयाने देशभरातून सूचना मागविल्या. सूचना व मतांचा अक्षरश: पाऊस पडला. त्यांचे संकलन ११,५०० पानांचे झाले.सध्याची न्यायाधीश निवडीची प्रक्रिया केंद्र सरकारने १९९९ मध्ये तयार केलेली आहे. आलेल्या सूचनांचा डोंगर पोखरून सुधारित निवड प्रक्रिया कशी ठरवावी यावर घटनापीठाने गेले महिनाभर विचार केला. पण असे ‘मेनोरंडम आॅफ प्रोसिजर’ तयार करणे हे न्यायालयाचे नव्हे तर प्रशासनाचे काम आहे. याआधीही सरकारनेच सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने हे काम केले आहे. त्यामुळे आता सुधारित निवड प्रक्रिया तयार करण्याचे कामही सरकारनेच सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने करावे, असे न्यायालयाने ताज्या आदेशात नमूद केले. शिवाय सरन्यायाधीशांनी यासंबंधीचा निर्णय एकट्याने न घेता चार ज्येष्ठतम न्यायाधीशांच्या ‘कॉलेजियम’च्या पातळीवर एकमताने घ्यावा, असेही घटनापीठाने नमूद केले.सुधारित निवड प्रक्रिया तयार करताना पात्रता निकष, निवडील पारदर्शकता, या कामासाठी स्वतंत्र सचिवालयाची स्थापना आणि संभाव्य उमेदवाराविरुद्धच्या तक्रारींची हाताळणी या संदर्भात कोणत्या बाबी विचारात घ्याव्यात हेही घटनापीठाने विषद केले.नियुक्त्या आणखी रखडणारनवी निवड प्रक्रिया ठरविण्यासाठी न्यायालयाने केंद्र सरकारला कोणतीही मुदत दिलेली नाही. मात्र त्यात अंतभूत करायचे न्यायाधीश निवडीचे पात्रता निकष राज्य सरकारांच्या सल्ल्याने ठरवायचे आहेत. त्यास साहजिकच वेळ लागेल. न्यायाधीशांच्या नेमणुका गेले वर्षभर रखडलेल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या सात अतिरिक्त न्यायाधीशांना हंगामी स्वरूपाची मुदतवाढ दिली गेली आहे. नवी निवड प्रक्रिया ठरेपर्यंत न्यायाधीशांची निवड न करणेच आपण पसंत करू, असे नवे सरन्यायाधीश न्या. तीर्थ सिंग ठाकूर यांनी पदग्रहणानंतर स्पष्ट केले आहे. त्यामुळे न्यायाधीशांच्या निवड व नेमणुका आणखी रखडण्याची शक्यता आहे.न्यायालयाचा आखडता हातपारदर्शकतेच्या बाबतीत न्यायालयाने आखडता हात घेतल्याचे ताज्या निकालातील पुढील निर्देशांवरून स्पष्ट होते:न्यायाधीश म्हणून निवडीसाठीचे पात्रता निकष आणि न्यायाधीश निवडीची प्रक्रिया संबंधित न्यायालयाच्या व केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध केली जावी. (तशीही सध्या प्रचलित असलेली निवड प्रक्रिया न्यायालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेच.)न्यायाधीशपदी नेमणुकीसाठी विचार केला जात असलेल्या व्यक्तीसंबंधीच्या तक्रारींची हाताळणी करण्याची सुयोग्य पद्धत सुधारित निवड प्रक्रियेत अंतभूत असावी. (कोणाचा विचार केला जात आहे हे जनतेला कळण्याची यात काही सोय नाही.)‘कॉलेजियम’मध्ये होणाऱ्या चर्चेची इतिवृते लिहिण्याची व कोणी विरोधी मत दिले असेल तरतेही नोंदविण्याीची सुयोग्य पद्धत अंतभूत करावी. (मात्र ‘कॉलेजियम’च्या बैठकींची इतिवृत्ते व बैठकीतील विरोधी मत वेबसाईटवर टाकण्याची यात तरतूद नाही.) त्यामुळे फार तर न्यायाधीश निवडीचे निकष जनतेला कळू शकतील. पण एखाद्याची निवड का केली अथवा का केली नाही, हे कळणार नाही.