चेन्नई : तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करण्यास आयोग नेमण्यात येईल व जयललितांचे चेन्नई शहरातील पोस गार्डन येथील निवासस्थान त्यांचे स्मारक म्हणून जतन केले जाईल, अशा दोन घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एडाप्पडी पलानीस्वामी यांनी केल्या.घाईगर्दीत बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पलानीस्वामी म्हणाले की, ‘अम्मां’चा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याची चौकशी करण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला जाईल.सत्ताधारी अण्णाद्रमुक पक्षाच्या ओ. पनीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखालील फुटीर गटाने विलिनिकरणाच्या वाटाघाटी सुरू करण्यासाठी जयललिता यांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी आणि शशिकला व त्यांच्या कुटुंबीयांना पक्षात कोणतेही स्थान असता कामा नये, अशा दोन पूर्वअटी घातल्या होत्या. (वृत्तसंस्था)
जयललितांच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 4:45 AM