- बलवंत तक्षक चंदीगड : सोन्याच्या तस्करीच्या नव्या पद्धतीचा अमृतसर विमानतळावर पर्दाफाश झाला आणि सर्व जण आश्चर्यचकित झाले. ज्यूसर, मिक्सर, इस्री, ड्रिल मशीन कोणतीही वस्तू तपासा, त्यात सोने आढळले. तेही थोडे थोडके नव्हे तर हे ५ कोटी रुपयांचे १० किलो सोने होते. या प्रकरणात सहा जणांना गजाआड करण्यात आले आहे.
दोन वेगवेगळ्या विमानांनी आलेल्या वस्तूंमधून सोन्याची ही तस्करी करण्यात आली. सोन्याला इतर धातूंनी झाकलेले होते. दुबईहून आलेल्या विमानातून पाच जणांना व एअर अरबियाहून आलेल्या विमानातून एकाला या प्रकरणात जेरबंद करण्यात आले. हे सर्व जण पंजाब व हरियाणाचे रहिवासी आहेत.
सोनेच सोने
हे सोने ज्या व्यक्तीपर्यंत पोहोचवले जाणार होतो, ती व्यक्ती राजस्थानची रहिवासी आहे. या विमानांतून आलेल्या या प्रवाशांच्या कोणत्याही साहित्याची तपासणी केली तर सोनेच सोने आढळत होते.