शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
5
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
6
"मविआ नेत्यांकडून जनतेची दिशाभूल", नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची प्रचार रॅली
7
५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
8
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
9
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
10
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
11
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
12
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
13
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
14
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
15
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
17
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
18
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
19
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!

‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजनेसाठी 31 जुलैची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 5:49 AM

सर्वाेच्च न्यायालयाचे राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना आदेश

ठळक मुद्देन्यायालयाने म्हटले की, ‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजनेमुळे स्थलांतरित मजुरांना देशातील कोणत्याही ठिकाणाहून रेशन कार्डाचा वापर करून धान्य घेता येईल.

नवी दिल्ली : येत्या ३१ जुलैपर्यंत ‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजनेची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांन दिले. तसेच कोविड-१९ ची साथ सुरू आहे, तोपर्यंत स्थलांतरित मजुरांत वितरित करण्यासाठी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना कोरडा शिधा पुरविण्यात यावा, असे आदेश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले.

न्या. अशोक भूषण आणि न्या. एम. आर. शाह यांच्या पीठाने हा निर्णय दिला. कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेत लावण्यात आलेली संचारबंदी व लॉकडाऊन मुळे स्थलांतरित मजुरांना पुन्हा एकदा हालअपेष्टा सहन कराव्या लागल्यामुळे तीन कार्यकर्त्यांनी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. स्थलांतरित मजुरांना खाद्य सुरक्षेची हमी मिळावी तसेच रोख हस्तांतरण व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, यासाठी केंद्र व राज्य सरकारांना आदेश देण्याची विनंती याचिकेत करण्यात आली होती.

न्यायालयाने म्हटले की, ‘एक देश, एक रेशन कार्ड’ योजनेमुळे स्थलांतरित मजुरांना देशातील कोणत्याही ठिकाणाहून रेशन कार्डाचा वापर करून धान्य घेता येईल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या (एनआयसी) मदतीने ३१ जुलैपर्यंत एक पोर्टल विकसित करावे. यावर असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करून त्यांना देशाच्या कोणत्याही भागातून रेशन उचलण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.

भोजनव्यवस्था सुरूच ठेवा!सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, की जोपर्यंत कोविड-१९ ची साथ आहे, तोपर्यंत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी स्थलांतरित मजुरांसाठी भोजनव्यवस्था (कम्युनिटी किचन) सुरूच ठेवावी. केंद्र सरकारने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना मोफत वितरणासाठी अन्नधान्य उपलब्ध करून देणे सुरूच ठेवावे. स्थलांतरित मजुरांना कोरडा शिधा देणारी योजना राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी ३१ जुलैपर्यंत तयार करावी. ही योजना पुढे जोपर्यंत कोविड-१९ साथ राहील, तोपर्यंत सुरूच ठेवण्यात यावी.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या