जुनागड - मतदारसंघात पंतप्रधानांची सभा झाली म्हणजे म्हणजे विजय निश्चित असे सर्वसाधारणपणे मानले जाते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान खुद्द पंतप्रधानांनी आपल्यासाठी प्रचारसभा घ्यावी, अशी अनेक उमेदवारांची इच्छा असते. पण गुजरातमध्ये लोकसभेचा असाही एक मतदारसंघ आहे जिथे पंतप्रधान ज्या उमेदवाराची सभा घेतात त्याचा विरोधी उमेदवार विजयी होतो. गुजरातमधील जुनागड लोकसभा मतदारसंघाबाबत अशी चर्चा असून, येथे जेव्हा जेव्हा पंतप्रधानांनी आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला तेव्हा तेव्हा विरोधी उमेदवार विजयी झाल्याचे समोर आले आहे. जुनागड येथील काँग्रेस आमदार भिखाभाई पटेल यांनी यासंदर्भात दावा केला आहे. ''विधानसभा, असो वा लोकसभा पंतप्रधान जेव्हा जेव्हा येथे प्रचारसभा घेताता. तेव्हा त्या संबंधित उमेदवाराचा पराभव होतो.'' असा दावा भिखाभाई पटेल यांनी केला आहे. दरम्यान, या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच सभा झाली आहे. जुनागड लोकसभा मतदारसंघात हा विचित्र योगायोग 1070 पासूनच सुरू आहे. त्यावेळी इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या त्यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचार केला होता. मात्र त्यावेळी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. त्यानंतर 1989 मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांनी काँग्रेस उमेदवार मोहनभाई पटेल यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. मात्र त्यावेळीही काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला. दरम्यान, ''जुनागड मतदारसंघातील या विचित्र योगायोगावरून भिखाभाई पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. "2017 च्या लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथून सहावेळा निवडून आलेल्या महेंद्र मशरू यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. मात्र त्यावेळी मी महेंद्र मशरू यांना पराभूत केले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावेळीही जुनागड येथे सभा घेतली आहे. त्याचा थेट लाभ काँग्रेसचे उमेदवार पुंजा वंश यांना मिळेल.''
विधानसभा असो वा लोकसभा, 'या' मतदारसंघात पंतप्रधान ज्याचा करतात प्रचार, त्याची होते हार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 3:21 PM