शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार
2
छोट्या बहिणीसमोर ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, गप्प राहण्यासाठी दिले 20 रुपये
3
"तेव्हा विराटने १,०९३ वेळा भगवान शंकराचा जप केला"; गंभीरने सांगितला 'तो' खास किस्सा
4
“राहुल गांधींना धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा”; काँग्रेस करणार राज्यभर आंदोलन
5
खेकड्यांनी धरण पोखरलेले, उंदरांनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे; गाड्या हवेत उडू लागल्या
6
“...तरच मी माझे शब्द मागे घेईन”; संजय गायकवाड यांनी राहुल गांधींसमोर ठेवली मोठी अट
7
ICU मध्ये चप्पल घालू नका सांगितल्यामुळे डॉक्टरला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल...
8
आतिशी २१ सप्टेंबरला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, उपराज्यपालांकडून सरकार स्थापनेचं निमंत्रण
9
SL vs NZ : WHAT A TALENT! शतकांची मालिका सुरुच; श्रीलंकेच्या खेळाडूसमोर सगळ्यांचीच 'कसोटी'
10
"सर्वात भयंकर म्हणजे पंतप्रधान-गृहमंत्र्यांनी याला भडकावणे", प्रियंका गांधी का संतापल्या?
11
"बाळासाहेब असते, तर तुम्हाला उलटे टांगले असते", बोरनारेंचा उद्धव ठाकरेंवर वार
12
अयोध्येतील राम मंदिरावर आतापर्यंत २५०० कोटींचा खर्च; सरकारला मिळणार इतक्या कोटींचा GST!
13
मोदी सरकारचा मोठा निर्णय; 'वन नेशन वन इलेक्शन' प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी
14
५०० रुपयांत गॅस सिलिंडर, मोफत उपचार... हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध, कोणासाठी काय-काय?
15
जगातील अनेक देशांमध्ये 'वन नेशन वन इलेक्शन'चा फॉर्म्युला लागू, अशी आहे प्रक्रिया...
16
रोहित शर्माची मुलाखत घेताना पहिला प्रश्न कुठला विचारशील? विराट कोहलीने दिलं मजेशीर उत्तर
17
Bigg Boss Marathi Season 5: निक्कीसोबत मैत्री? वैभव चव्हाण म्हणाला, 'तोंडावर सांगतो तिच्याशी माझी कधीच..."
18
राज्याला महिला CM मिळेल? सुप्रिया सुळे-रश्मी ठाकरेंचे नाव चर्चेत? काँग्रेस खासदार म्हणतात...
19
“राहुल गांधींच्या जीवाला धोका, रणनीती आखली जाते, केंद्रीय गृहमंत्री...”; राऊतांचा मोठा आरोप
20
सुखी, समाधानी, समृद्ध जीवन हवे? पाहा, स्वामी समर्थ अन् शंकर महाराजांची प्रभावी वचने

ज्युनिअर डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरण; CBI ची मोठी कारवाई, आरजी कारचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 12:14 AM

यापूर्वी सीबीआयने घोष यांना आर्थिक अनियमिततेप्रकरणी अटक केली होती. आता बलात्कार-हत्ये प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे.

 कोलकाता आरजी कार मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात एका ज्युनिअर डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्ये प्रकरणी आता  सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने आरजी कार मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना अटक केली आहे. ते 23 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत.

यापूर्वी सीबीआयने घोष यांना आर्थिक अनियमिततेप्रकरणी अटक केली होती. आता बलात्कार-हत्ये प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. सीबीआयने आरजी कार बलात्कार प्रकरणी एफआयआर दाखल कण्यास झालेला उशीर आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवत संदीप घोष आणि तळा पोलीस ठाण्याचे एसएचओ अभिजीत मंडल यांना अटक केली आहे. संदीप यांना रविवारी सियालदह न्यायालयात हजर केले जाईल.

संदीप घोष यांना एकांत कोठडीत ठेवण्यात आले आहे -सध्या घोष यांना प्रेसीडेंसी सेंट्रल जेलच्या एका एकांत कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्यांना येथे याच आठवड्याच्या सुरुवातीला आणण्यात आले होते. सीबीआयने संदीप घोष यांना 2 सप्टेंबरला अटक केली होती. कोलकता उच्च न्यायालयाने परिसरात एका ज्युनिअर डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्येप्रकरणी सीबीआई चौकशीचे आदेश दिले होते. 

कोलकात्यातील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये 9 ऑगस्टरोजी एक 31 वर्षीय ज्युनिअर डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता. तिच्यावर हत्येपूर्वी कृरपणे बलात्कार झाल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आले होते. याप्रकरणी देशभरात संतापाची लाट आहे. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालdoctorडॉक्टरCBIगुन्हा अन्वेषण विभागhospitalहॉस्पिटलSexual abuseलैंगिक शोषण