ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 30 - "फक्त गोमाता की जय म्हणून गोमातेचे संरक्षण होणार नाही. त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाने स्वत:हून गोमातेच्या रक्षणासाठी प्रयत्न केल्यावरच गोमातेला वाचवण्यात यश येईल," असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे.
योगी आदित्यनाथ त्यांचा मतदारसंघ असलेल्या गोरखपूरच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी आरएसएस आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी समन्वय बैठकीत बोलताना आदित्यनाथ यांनी गो-संरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला.
महापुरुषांचे जातीच्या आधारावर विभाजन करणाऱ्यांनादेखील आदित्यनाथ यांनी खडेबोल सुनावलेत. "आपण महापुरुषांना जातीच्या आधारावर वाटून घेतले आहे. हे केवढे मोठे पाप आहे. प्रत्येक जातीचा एक महापुरुष आहे," अशी खंत यावेळी आदित्यनाथ यांनी व्यक्त केली.
तसंच नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण करणेही आवश्यक आहे. नदी, नाले, तलाव प्रदुषित होऊ नयेत, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचं योगी म्हणालेत. यावेळी उदाहरण देत असताना त्यांनी पूर्वांचलमध्ये आजारांमुळे दर वर्षी शेकडो मुलांचा मृत्यू होतो असे सांगितले. स्वच्छ भारत योजनेअंतर्गत पुरेशी स्वच्छता राखल्यास अनेक मुलांचा जीव वाचू शकेल, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले.
‘नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण आवश्यक आहे. आपण जलस्रोतांचे नुकसान केले आहे. जलस्रोत दूषित झाल्याने लहान मुलांना विविध आजार होतात. नदीनाले प्रदुषित होऊ न देणे प्रत्येकाची जबाबदारी आहे,’ असे सांगत स्वच्छता राखण्याचं आवाहन यावेळी आदित्यनाथ यांनी केले.
Humne mahapurushon ko jaati ke aadhar par baant diya hai, itna ghor paap kiya hai. Har jaati ka mahapurush khada ho gaya hai: UP CM pic.twitter.com/QNIRfDhJmM— ANI UP (@ANINewsUP) April 30, 2017
Gau mata ki jai to hum bolein lekin unke samarthan ke liye imaandari se apne starr par bhi prayas karein, tabhi gau mata bach payengi: UP CM pic.twitter.com/IgZG4bcOgp— ANI UP (@ANINewsUP) April 30, 2017