नवी दिल्ली : मुंबई उच्च न्यायालयाच्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीश न्या. विजया कापसे ताहिलरामाणी यांची मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक करावी, अशी शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या ‘कॉलेजियमन’ने केली आहे. न्या. ताहिलरामाणी मद्रासला गेल्यावर, अन्य कोणी मुख्य न्यायाधीशनेमला जाईपर्यंत न्या. नरेश पाटील मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश होतील.‘कॉलेजियम’ने देशातील अन्य सहा उच्च न्यायालयांच्या नव्या मुख्य न्यायाधीशांच्या नेमणुकांनाही शुक्रवारी मंजुरी दिली आहे. त्या नेमणुका अशा आहेत: दिल्ली-न्या. राजेंद्र मेनन (मूळ कोलकाता), केरळ- न्या. ऋषिकेश रॉय (मूळ गुवाहाटी), पाटणा- न्या. एम. आर. शहा (मूळ गुजरात), ओडिशा- न्या. के.एस. झवेरी (मूळÞ गुजरात), झारखंड- न्या. अनिरुद्ध बोस (मूळ कोलकाता) आणि जम्मू व काश्मीर- न्या. गीता मित्तल (मूळ दिल्ली). विशेष म्हणचे ‘कॉलेजियम’ने आधी न्या. बोस यांची दिल्लीसाठी शिफारस केली होती. परंतु सरकारने त्यास आक्षेप घेतल्याने त्यांना दिल्लीऐवजी झारखंडच्या न्यायालयात नेमण्यात आले आहे.
न्या. ताहिलरामाणी मद्रासच्या मुख्य न्यायाधीश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 4:42 AM