लोक अदालतातून न्याय मिळणे सोपे : न्यायाधीश बाक्रे
By admin | Published: February 14, 2015 11:51 PM
वाळपई : प्रत्येक तालुक्यात सुरू होत असलेली लोक अदालत ही सर्वांसाठी न्याय मिळण्याची सोपी पद्धत झाली आहे. त्यामुळे वेळ व पैसा वाया जाणार नाहीत, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे गोवा खंडपीठाचे न्यायाधीश उत्कर्ष बाक्रे यांनी वाळपईत राष्ट्रीय मासिक लोक न्यायालयाचे उद्घाटन करताना केले.
वाळपई : प्रत्येक तालुक्यात सुरू होत असलेली लोक अदालत ही सर्वांसाठी न्याय मिळण्याची सोपी पद्धत झाली आहे. त्यामुळे वेळ व पैसा वाया जाणार नाहीत, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे गोवा खंडपीठाचे न्यायाधीश उत्कर्ष बाक्रे यांनी वाळपईत राष्ट्रीय मासिक लोक न्यायालयाचे उद्घाटन करताना केले. ते म्हणाले की, लोक अदालत हे नियमित न्यायालयाच्या बाहेर येऊन निकाल लावण्याची सोपी पद्धत, पण कायदेशीर अशीच आहे. लोक अदालतीत एका दिवसात निकाल लागतो तसेच त्यात निकालाशिवाय बाजू मांडू शकतो. निकाल बंधनकारक व त्यावर अपील करता येत नाही. समोपचाराने प्रकरण मिटविल्याने दोन्ही पक्ष जिंकतात. त्यासाठी लोक अदालत ही योग्य अशीच आहे. उद्घाटन कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उच्च न्यायालयाचे गोवा प्रबंधक न्यायाधीश ए.सी. चंडक, उत्तर गोवा न्यायाधीश भरत देशपांडे, वाळपई दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश शुभदा दळवी, उत्तर गोवा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. संजय राणे व सत्तरी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. यशवंत गावस यांची उपस्थिती होती. या वेळी न्यायाधीश शुभदा दळवी म्हणाल्या की, सामान्य लोकांना न्यायालयात जाऊ नये. त्यांना लागणारा वेळ व खर्च होऊ नये म्हणून लोक अदालतीची संकल्पना झाली असून वाळपईत आतापर्यंत २३४ जणांना त्याचा लाभ मिळाला आहे. वाळपईत प्रथम लोक अदालत १२ डिसेंबर २००४ ला सुरू झाली. ॲड. संजय राणे यांनी लोक अदालत विषयी माहिती दिली. सूत्रसंचालन ॲड. भालचंद्र मयेकर तर आमदार ॲड. यशवंत गावस यांनी केलेे. फोटो : वाळपई लोक अदालतचे उद्घाटन करताना गोवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश उत्कर्ष बाक्रे व इतर.