शीलेश शर्मा नवी दिल्ली : सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती ब्रजगोपाल लोया यांच्या गूढ मृत्यूचे प्रकरण न्यायपालिकेच्या कक्षा ओलांडून राजकीय संघर्षाकडे वाटचाल करत असल्याचे दिसते. न्या. लोया यांचा मुलगा अनुज अखेर जबाब का बदलत आहे? कोण दबाव आणत आहे? त्यामागे काय उद्देश आहे? असे प्रश्न आता न्यायालय परिसरात विचारले जात आहेत.न्या. लोया यांच्या जवळचे नातेवाईक श्रीनिवास यांचे म्हणणे आहे की, अनुज लहान आहे. त्याच्यावर दबाव असू शकतो. ही शंका उपस्थित होण्याचे कारण असे की, १८ फेब्रुवारी २०१५ रोजी अनुजने आपल्या हाताने चिठ्ठी लिहून झाल्याप्रकाराविषयी मुख्य न्यायाधीशांकडे शंका व्यक्त केली होती. मात्र, आता अनुजने जबाब बदलला आहे.या घटनाक्रमांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने अशी मागणी केली आहे की, कोण काय म्हणत आहे याकडे लक्ष न देता सत्य समोर आणण्यासाठी तपास करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी यापूर्वीच न्या. लोया यांच्या मृत्यू प्रकरणी तपास करण्याची मागणी केलेली आहे.
न्या. लोयांच्या कुटुंबीयांवर दबाव आहे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 3:38 AM