- हरीश गुप्तानवी दिल्ली : राष्ट्रीय हरित लवाद कायमचा गुंडाळण्याचा विचार केंद्र सरकारने बदलला असून, आता या लवादाच्या अध्यक्षपदी न्या. आदर्शकुमार गोयल यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.लवादाच्या अध्यक्षपदावरून न्या. स्वतंत्रकुमार सहा महिन्यांपूर्वी निवृत्त झाले. त्यानंतर लवादाचे कामकाज जवळजवळ ठप्प होते. लवादातील कर्मचाऱ्यांची ८० टक्के पदे डिसेंबरपासून रिक्त आहेत.लवादावर अध्यक्ष म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता असलेले न्या. गोयल जुलैमध्ये निवृत्त होतील. सर्वोच्च न्यायालयात २०१४ साली नियुक्ती होण्यापूर्वी गोयल ओडिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. राष्ट्रीय हरित लवादाच्या कायद्यातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाचीच लवादाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करता येते.
राष्ट्रीय हरित लवादाच्या अध्यक्षपदी न्या. गोयल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 2:45 AM