हैदराबाद : मक्का मशीद बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल दिल्यानंतर काही तासांनी राजीनामा दिलेले चौथे अतिरिक्त महानगर सत्र न्यायमूर्ती के. रवींद्र रेड्डी यांनी राजीनामा मागे घेऊन गुरुवारी पुन्हा काम सुरू केले.आंध्र प्रदेश व तेलंगणा उच्च न्यायालयाने त्यांचा राजीनामा फेटाळला होता. त्यानंतर अधिकाऱ्यांना नव्याने पाठवलेल्या पत्रात रेड्डी यांनी हैदराबाद उच्च न्यायालयाला मला स्वेच्छानिवृत्ती घेण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेड्डी यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली तरी त्यांना सेवानिवृत्तीचेसगळे लाभ मिळतील व राजीनाम्यामुळे असे लाभ मिळणार नाहीत, असे स्पष्ट झाल्यामुळे त्यांनी राजीनामा मागे घेतला. रेड्डी यांचा राजीनामा हा आवश्यक त्या स्वरूपात नाही हे अधिकाºयांच्या लक्षात आले.आंध्र प्रदेशच्या निवृत्तिवेतनाच्या नियमांनुसार ज्यांना स्वेच्छानिवृत्तीचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी तशी सूचना तीन महिने आधी द्यायची असते. रेड्डी येत्या जून महिन्यात ५८ वर्षांचे होतील व त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ दिली गेली नाही तर ते निवृत्त होतील.
न्या. रवींद्र रेड्डींचा राजीनामा मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:53 AM