शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

न्या. कर्नन यांचा सुप्रीम कोर्टात बंडखोर पवित्रा

By admin | Published: February 14, 2017 12:47 AM

कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. सी. एस. कर्नन त्यांच्याविरुद्ध काढलेल्या न्यायालयीन अवमानना नोटिशीला (कन्टेम्प्ट आॅफ कोर्ट) उत्तर देण्यासाठी

नवी दिल्ली : कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. सी. एस. कर्नन त्यांच्याविरुद्ध काढलेल्या न्यायालयीन अवमानना नोटिशीला (कन्टेम्प्ट आॅफ कोर्ट) उत्तर देण्यासाठी सोमवारी जातीने हजर न राहिल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आणखी एक संधी देत पुढील सुनावणी १० मार्चपर्यंत तहकूब केली.अनेक न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या न्या. कर्नन यांनी पंतप्रधान व सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्राची दखल घेत सरन्यायाधीश न्या. जे. एस. केहर यांच्या नेतृत्वाखालील सात न्यायाधीशांच्या विशेष पीठाने त्यांच्याविरुद्ध कन्टेम्प्टची नोटीस काढली होती. न्या. कर्नन यांना आज जातीने हजर राहून नोटिशीला उत्तर देण्यास सांगण्यात आले होते.मात्र न्या. कर्नन स्वत: हजर झाले नाहीत. दोन दिवसांपूर्वी न्या. कर्नन यांनी या नोटिशीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाच्या महाप्रबंधकांना पत्र लिहिले होते व आपण दलित असल्याने सवर्ण न्यायाधीश आपल्याविरुद्ध आकसाने कारवाई करीत असल्याचा आरोप केला होता.या पत्राचा उल्लेख करत सरन्यायाधीश न्या. केहर म्हणाले की, न्या. कर्नन यांनी हजर न राहण्याचे कारण कळविलले नाही. परंतु त्यांच्या पत्रात नोटिस काढण्यापूर्वी बाजू मांडण्याची संधी न देण्यात आल्याची तक्रार आहे. त्यामुळे पुढे जाण्याआधी त्यांना एक संधी द्यायला हवी.अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी म्हणाले की, न्यायालयास पाठविलेल्या ताज्या पत्राने न्या. कर्नन यांनी केलेल्या अवमानाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. यावर खंडपीठावरील एक न्यायाधीश न्या. दीपक मिश्रा म्हणाले की, न्या. कर्नन यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरन्ट काढणे किंवा त्यांना हजर होण्याची आणखी एक संधी देणे असे दोन पर्याय आहेत. होणारे परिणाम गंभीर असल्याने त्यांना आणखी संधी देणेच इष्ट ठरेल, असे न्या. मिश्रा व सरन्यायाधीश म्हणाले. (वृत्तसंस्था)अनाहूत वकिलांस बंदीच्काही वकील आणि वकिलांच्या संघटना न्या. कर्नन यांच्या बाजूने न्यायालयात उभे राहण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त होते. च्त्याची दखल घेत सरन्यायाधीशांनी अशा अनाहूत वकिलांना व संघटनांना मज्जाव केला आणि न्या. कर्नन यांनी वकिलपत्र दिलेले नसेल तर अशा कोणालाही त्यांच्यावतीने बाजू मांडता येणार नाही, असे बजावले.