शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
2
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
3
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
4
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
6
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
7
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
8
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
9
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत?
11
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
12
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
13
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
14
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
15
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
16
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
17
विशेष लेख: कट्टर उजवे आणि वादग्रस्त - ऑल द प्रेसिडेंट्स मेन....
18
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
19
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
20
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात

जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 10:05 PM

Justice Sanjiv Khanna: संजीव खन्ना हे फौजदारी, दिवाणी, कर आणि घटनात्मक कायद्यांचे तज्ञ आहेत.

Justice Sanjiv Khanna Appointment: न्यायमूर्ती संजीव खन्ना देशाचे पुढील सरन्यायाधीश होणार आहेत. त्यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विद्यमान सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड 10 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. न्यायमूर्ती खन्ना हे 11 नोव्हेंबरपासून देशाचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून सूत्रे हाती घेतील. संजीव खन्ना 13 मे 2025 रोजी निवृत्त होणार आहेत, त्यामुळे सरन्यायाधीश पदावर ते फक्त सहा महिन्यांसाठी असतील.

1983 मध्ये कायद्याचा सराव सुरू करणारे न्यायमूर्ती खन्ना 2005 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. जानेवारी 2019 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांना फौजदारी, दिवाणी, कर आणि घटनात्मक कायद्यातील एक उत्तम तज्ञ मानले जातात.

न्यायमूर्ती हंसराज खन्ना यांचे पुतणेत्यांची आणखी एक ओळख म्हणजे ते ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध न्यायमूर्ती हंस राज खन्ना यांचे पुतणे आहेत. न्यायमूर्ती एचआर खन्ना हे आणीबाणीच्या काळात 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाचे एकमेव न्यायाधीश होते, ज्यांनी आणीबाणीच्या काळातही नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराला बाधा आणता येणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळेच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी सरकारने त्यांना सरन्यायाधीश होऊ दिले नाही, असे मानले जाते.

अनेक महत्वाच्या खटल्यांचे निकाल दिलेन्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी सर्वोच्च न्यायालयात आपल्या कार्यकाळात अनेक मोठे निर्णय दिले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी त्यांनी दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर करताना असे म्हटले होते की, पीएमएलए कायद्यातील कठोर तरतुदी एखाद्याला खटल्याशिवाय जास्त काळ तुरुंगात ठेवण्याचा आधार असू शकत नाहीत. VVPAT आणि EVM 100 टक्के जुळण्याची मागणी त्यांनी फेटाळून लावली होती. इलेक्टोरल बाँड्स असंवैधानिक घोषित करणाऱ्या खंडपीठाचे ते सदस्य होते. विवाह चालू राहणे अशक्य असल्यास सर्वोच्च न्यायालय थेट घटस्फोटाचा आदेश देण्यासाठी आपल्या विशेष अधिकाराचा वापर करू शकते, असेही त्यांनी नमूद केले होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय