उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश थोट्टाथिल बी राधाकृष्णन यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 09:55 AM2023-04-03T09:55:18+5:302023-04-03T09:59:06+5:30

सोमवारी पहाटे कोची येथील एका खासगी रुग्णालयात थोट्टाथिल बी. राधाकृष्णन यांनी अखेरचा श्वास घेतला.

Justice Thottathil B Radhakrishnan passes away | उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश थोट्टाथिल बी राधाकृष्णन यांचे निधन

उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश थोट्टाथिल बी राधाकृष्णन यांचे निधन

googlenewsNext

नवी दिल्ली : उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश थोट्टाथिल बी. राधाकृष्णन यांचे आज निधन झाले आहे. सोमवारी पहाटे कोची येथील एका खासगी रुग्णालयात थोट्टाथिल बी. राधाकृष्णन यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. 

थोट्टाथिल बी. राधाकृष्णन हे कोलकाता, केरळ, तेलंगणा, हैदराबाद आणि छत्तीसगड उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले होते. तसेच, ते केरळ लीगल सर्व्हिस अथॉरिटीचे कार्यकारी अध्यक्ष सुद्धा होते. 

थोट्टाथिल बी. राधाकृष्णन यांनी 1983 मध्ये वकील म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. त्यानंतर त्यांनी 14 ऑक्टोबर 2004 रोजी केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. त्यांच्या यशस्वी कारकिर्दीत त्यांना दोनदा केरळ उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश (Acting Chief Justice) म्हणून नियुक्त करण्यात आले. 

याचबरोबर, थोट्टाथिल बी. राधाकृष्णन हे तेलंगणातील विशेष उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश होते. तसेच, त्यांनी छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालयांमध्ये मुख्य न्यायाधीश म्हणूनही काम केले होते.

Web Title: Justice Thottathil B Radhakrishnan passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.