नवी दिल्ली : विद्यमान सरन्यायाधीश न्या. एच.एल. दत्तु येत्या २ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायाधीश न्या. तीर्थसिंह ठाकूर देशाचे नवे सरन्यायाधीश होतील.अधिकृत सूत्रांनुसार सरन्यायाधीश न्या. दत्तु यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून न्या. ठाकूर यांच्या नावाची औपचाारिक शिफारस सोमवारी केली. सरन्यायाधीश ज्येष्ठता क्रमानुसार नेमण्याची प्रथा आहे. गेली सहा वर्षे न्यायाधीश असलेले न्या. ठाकूर सरन्यायाधीशांनंतर सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. केंद्रीय विधी व न्याय मंत्रालय व पंतप्रधानांकडून मंजुरी मिळण्याची औपाचारिकता पूर्ण झाल्यावर राष्ट्रपती न्या. ठाकूर यांच्या नियुक्तीचे अधिकृत आदेश यथावकाश काढतील. न्या. ठाकूर भारताचे ४३ वे सरन्यायाधीश होतील. त्यांना ३ डिसेंबर २०१५ ते ३ जानेवारी २०१७ असा १३ महिन्यांचा कार्यकाळ मिळेल.(लोकमत न्यूज नेटवर्क)
न्या. तीर्थ सिंह ठाकूर होणार सरन्यायाधीश
By admin | Published: November 05, 2015 2:55 AM