नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनच्या काळात आपल्या आजारी वडिलांना सायकलवर बसवून 1200 किमी प्रवास करणाऱ्या ज्योती कुमारीचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. यातच बिहारमधील प्रसिद्ध कोचिंग सेंटर 'सुपर ३०'ने ज्योती कुमारीला मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्योती कुमारीला 'सुपर ३०'ने आपल्या कोचिंग सेंटरमध्ये इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षेची तयारी म्हणजेच IIT-JEE परीक्षेसाठी शिकण्याची ऑफर दिली आहे.
'सुपर ३०'चे संस्थापक आनंद कुमार यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. यामध्ये ते म्हणाले, "बिहारची कन्या ज्योती कुमारी हिनं आपल्या वडिलांना सायकलवर बसवून दिल्लीहून १२०० किलोमीटरचा प्रवास केला आहे. हे एक उदाहरण दिले आहे. काल माझा भाऊ प्रणव कुमार ज्योतीला भेटला. जर ज्योतीला पुढे आयआयटी प्रवेश परीक्षेची तयारी करायची असेल तर तिचं 'सुपर 30' मध्ये स्वागत असेल." याचबरोबर, आनंद कुमार यांनी ट्विटरवर प्रणव कुमार यांनी ज्योती कुमारी आणि तिचा वडिलांची भेट घेतलेला फोटो शेअर केला आहे.
ज्योती कुमारीचे वडील ही गुरुग्राममध्ये ई-रिक्षा चालवायचे. मात्र, त्यांचा अपघात झाला आणि ते जखमी झाले. लॉकडाऊनमध्ये पैसे संपले तसेच घर मालकानंही घर खाली करण्यासाठी दबाव आणला. त्यामुळं तिनं सायकलनं प्रवास करायचा असं ठरवलं. ज्योती कुमारीनं आपल्या आजारी वडिलांना घेऊन बिहारला जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिनं एक सायकल देखील खरेदी केली. आजारी वडिलांना घेऊन तिनं गुरुग्राममधून सायकलनं आपला प्रवास सुरू केला आणि सात दिवसांनी ते त्यांच्या घरी सुखरुप पोहोचले.
दरम्यान, ज्योती कुमारीच्या या संघर्षमय प्रवासाचं कौतुक सर्व स्तरातून होत आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रम्प यांनीही कौतुक केलं आहे. यासंदर्भात इव्हांका ट्रम्पने ट्विट केलं की,''15 वर्षीय ज्योती कुमारीनं तिच्या आजारी वडिलांना सायकवरून सात दिवस 1200 किमी प्रवास केला. भारतीय लोकांच्या कल्पनाशक्तीनं मला हे सहनशक्ती व प्रेमाचे सुंदर चित्र पाहायला मिळाले."
आणखी बातम्या...
पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; जवानांनी वेळेत कारमधील IED केलं डिफ्यूज
Corona News in Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी दोन कोरोना बाधित, संख्या पोहोचली १९ वर
हिपॅटायटीस सी आणि एचआयव्हीचे औषध कोरोनावर मात करण्यासाठी प्रभावी, भारतीय वैज्ञानिकांचा दावा