शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
3
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
4
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
5
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
6
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
7
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
8
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
9
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
10
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
11
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
12
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
13
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
14
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
15
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
16
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
17
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
19
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
20
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)

राज्यसभा उमेदवारीसाठीच ज्योतिरादित्य अस्वस्थ, महत्त्व घटण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 4:16 AM

राज्यसभेचे तिकीट कोणाला द्यायचे यावरून मध्यप्रदेश काँग्रेसमध्ये चाललेला संघर्ष हेच काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या अस्वस्थतेमागील मुख्य कारण असल्याचे समजते.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : राज्यसभेचे तिकीट कोणाला द्यायचे यावरून मध्यप्रदेश काँग्रेसमध्ये चाललेला संघर्ष हेच काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांच्या अस्वस्थतेमागील मुख्य कारण असल्याचे समजते. त्यातूनच त्यांनी आपल्या टिष्ट्वटर खात्यातील स्वपरिचयातून काँग्रेस पक्षाचे नाव वगळल्याचा प्रकार घडला असल्याची चर्चा आहे. ज्योतिरादित्य भाजपमध्ये प्रवेश करू इच्छित असतील तर त्यांचे स्वागत करण्यास तो पक्ष उत्सुक आहे.राज्यसभेच्या मध्य प्रदेशमधील तीन जागांसाठी एप्रिल महिन्यात निवडणूक होणार आहे. २३० सदस्य असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेमध्ये काँग्रेसचे ११५ आमदार असून ते राज्यसभेवर आपला एक उमेदवार सहजी निवडून आणू शकतात. भाजपकडेही १०७ आमदार असून तेही एक जागा विनासायास जिंकणार आहेत. प्रश्न आहे तो फक्त तिसऱ्या जागेचा. ती जागा काँग्रेस किंवा भाजप यापैकी कोण जिंकणार हे त्यावेळच्या परिस्थितीवरच अवलंबून राहिल. दिग्विजयसिंह यांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत एप्रिलमध्ये संपत असून त्यांना पुन्हा उमेदवारी हवी आहे. त्यांच्या मार्गात आडवे येणे कमलनाथ यांना परवडणारे नाही. ही जागा वगळता अन्य दोन जागांवरील उमेदवार निवडताना काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. त्यामुळे हा निर्णय राज्य पातळीवरील नेत्यांनीच घ्यावा असेही सांगितले जाईल.भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, ज्योतिरादित्य सिंदिया यांना भाजपमध्ये प्रवेश द्यायचा की नाही याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. मात्र तशी शिफारस मध्य प्रदेश भाजपकडून करण्यात आलेली नाही. ज्योतिरादित्य यांच्या नातेवाईक वसुंधराराजे शिंदे, यशोधराराजे सिंदिया या भाजपमध्येच आहे याचीही आठवण या नेत्याने करून दिली.एकटे पडण्याची भीतीआपल्याला राज्यसभेची उमेदवारी कदाचित मिळणार नाही व मध्यप्रदेशमध्ये राज्यपातळीवरही फारशी मोठी जबाबदारी हाती नसेल या विचाराने ज्योतिरादित्य अस्वस्थ आहेत.राहुल गांधी हे काँग्रेस अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या स्तरावर ज्योतिरादित्यांचे महत्त्व कमी झाले आहे. त्यामुळे आपण एकटे पडतो आहोत की काय, या भावनेने त्यांना ग्रासले आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेस