भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये आज मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. काँग्रेसमधून भाजपात डेरेदाखल झालेले महाराज ज्योतिरादित्य शिंदे या विस्तारातून 'अमृत' घेऊन गेले असून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हाती 'विष' उरले आहे. राज्याची माजी मुख्यमंत्री आणि भाजपाच्या उपाध्यक्षा असलेल्या उमा भारती या चांगल्याच संतप्त झाल्या असून जातीय संतुलन राखले नसल्याने उघडउघड नाराजी व्यक्त करतानाच त्यांनी पक्षाच्या नेतृत्वालाही परखड पत्र लिहिले आहे.
आज मध्य प्रदेशमध्येकाँग्रेसचे सरकार पाडून पुन्हा मुख्यमंत्री बनलेल्या शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यासाठी गेला महिनाभर दिल्लीत शिंदे तळ ठोकून होते. राज्यसभेची खासदारकी मिळवितानाच त्यांनी राज्य सरकारमध्येही चांगलेच वजन मिळविले आहे. यावर दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करून आल्यानंतर शिवराजसिंह यांनी बोलकी प्रतिक्रिया दिली होती. महामंथनातून अमृत निघाले होते, पण भगवान शिव यांनी विष प्राशन केले होते, असे ते म्हणाले होते. आता हेच खरे होताना दिसत आहे.
आज बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाची लखनऊच्या विशेष न्यायालयामध्ये सुनावणी होती. यामुळे साध्वी उमा भारती न्यायालयासमोर हजर होण्यासाठी आल्या होत्या. भारती यांनी बुधवारीच पक्ष नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केली होती. तसेच मंत्रिमंळामध्ये जातीय असंतुलन नीट करण्याची मागणीही त्यांनी केली होती. मात्र, त्यांच्या या मागणीला महत्वा दिले गेले नाही.
मध्य प्रदेशमध्ये गुरुवारी सकाळी 11 वाजता राजभवनामध्ये 28 मंत्र्यांना शपथ देण्यात आली. यामध्ये 20 कॅबिनेट आणि 8 राज्य मंत्री आहेत. मंत्र्यांना कोणती मंत्रीपदे देणार यावरून अद्याप पडदा उठलेला नसून ज्योतिरादित्य शिंदे समर्थकांना झुकते माप मिळाल्याने पक्षामध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
शिंदे समर्थकांचे प्राबल्य28 मंत्र्यांमध्ये 11 मंत्री हे एकट्या ज्योतिरादित्य शिंदेंचे समर्थक आहेत. अद्याप हे मंत्री निवडून यायचे आहेत. तर आधीच्या मंत्रिमंडळामध्ये तीन मंत्री हे शिदेंचे होते. यामुळे हा आकडा 14 झाला आहे. कमलनाथ सरकारमध्ये शिंदे यांच्या वाट्याला 6 मंत्रीपदेच आली होती. शपथविधी होताच शिंदे यांनी काँग्रेसचे नाव न घेता 'टायगर अभी जिंदा है।' अशा शब्दांत इशारा दिला आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मोठी डील! चीनविरोधात लढण्यासाठी रशिया भारताला देणार 33 लढाऊ विमाने
सरकारी बँकेत नोकरीची मोठी संधी सोडू नका; 1850 जागांवर भरती
लॉकडाऊनमध्ये सरकारी नोकऱ्यांचा पाऊस! ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती; IBPS द्वारे करा अर्ज
गावाकडे चला! SBI मध्ये नोकरीची मोठी संधी; 25000 रुपयांपर्यत पगार
FD पेक्षाही जास्त व्याज देणार; केंद्र सरकारची 'अफलातून' योजना लाँच
OMG! पॉझिटिव्ह रिपोर्ट दुसरीचाच; तरुणीला तीन दिवस कोरोना बाधितांसोबत 'डांबले'
ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसला दुसरा मोठा झटका देणार; शिवराजसिंहांचीही डोकेदुखी वाढणार