Video - धक्काबुक्की, शिवीगाळ करत भाजपा जिल्हाध्यक्ष आणि ज्योतिरादित्य शिंदे समर्थक भिडले; अंतर्गत वाद चव्हाट्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 12:58 PM2021-03-15T12:58:30+5:302021-03-15T13:04:09+5:30

Jyotiraditya Scindia Supporters And BJP leader Clash : धक्काबुक्की आणि शिवीगाळ करत भाजपा जिल्हाध्यक्ष आणि ज्योतिरादित्य शिंदे समर्थक आपापसात भिडल्याची घटना समोर आली आहे.

jyotiraditya scindia supporters and bjp leader clash pro scindia erupted after insult | Video - धक्काबुक्की, शिवीगाळ करत भाजपा जिल्हाध्यक्ष आणि ज्योतिरादित्य शिंदे समर्थक भिडले; अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Video - धक्काबुक्की, शिवीगाळ करत भाजपा जिल्हाध्यक्ष आणि ज्योतिरादित्य शिंदे समर्थक भिडले; अंतर्गत वाद चव्हाट्यावर

googlenewsNext

नवी दिल्ली - भाजपामधील अंतर्गत वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. धक्काबुक्की आणि शिवीगाळ करत भाजपा जिल्हाध्यक्ष आणि ज्योतिरादित्य शिंदे समर्थक आपापसात भिडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांना एका कार्यक्रमाला जाण्यापासून रोखण्यात आलं त्यानंतर हा राडा झाल्याची माहिती मिळत आहे. व्हायरल झालेल्या व्हि़डीओमध्ये वाद झाल्यानंतर कार्यकर्ते एकमेकांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करत असलेले पाहायला मिळत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या मुरैनामध्ये ही घटना घडली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष योगेश पाल गुप्ता आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक आणि भाजपाचे नेते हरिओम शर्मा यांच्यामध्ये काही कारणांवरून वाद झाला. पुढे या वादाचं रुपांतर हे धक्काबुक्कीत झालं आणि एकमेकांना अपशब्द बोलण्यात आले. पक्षांतर्गत असलेला वाद उफाळून आला आणि कार्यकर्ते भिडले. याच दरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नेत्यांनी मध्यस्थी करत हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. 

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व्ही. डी. शर्मा आणि केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर हे मुरैना दौऱ्यावर आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी मुरैनामध्ये एका कार्यकर्त्याच्या घरी भोजनही केले. भोजन कार्यक्रमाच्या आधी ज्येष्ठ नेते भोजन करत असलेल्या कार्यकर्त्यांच्या घरात जाण्यापासून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे समर्थकांना रोखलं. त्यामुळे भाजपाचे हरिओम शर्मा प्रचंड भडकले. त्य़ानंतर शर्मा आणि योगेश पाल गुप्ता यांच्यात शाब्दिक चकमक उडाली आणि एकच गोंधळ निर्माण झाला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून काँग्रेसने निशाणा साधला आहे. 

"मी जीव द्यायला जातेय" म्हणत भाजपा खासदाराच्या सुनेनं केला आत्महत्येचा प्रयत्न; पतीवर केले गंभीर आरोप

लखनऊच्या मोहनलालगंज मतदारसंघातून भाजपाचे खासदार असणाऱ्या कौशल किशोर (Kaushal Kishore) यांच्या सुनेने आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला आहे. खासदारांची सून अंकिता यांनी खासदारांच्या घराबाहेर आपल्या हाताची नस कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने अंकिता यांना रुग्णालयात दाखल केलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आत्महत्येआधी अंकिता यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी "मी जीव द्यायला जातेय" असं म्हटलं आहे.

अंकिता यांनी आपले पती आयुष यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. व्हिडीओमध्ये अंकिताने आपण आत्महत्या करायला जात असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर त्या आपल्या स्कूटीने खासदारांच्या दुबग्गा येथील घरी पोहोचल्या. तिथे त्यांनी आपल्या हाताची नस कापून घेतल्याचं म्हटलं जात आहे. "मी कोणासोबत लढू शकत नाही कारण तुमचे वडील हे खासदार आहे. माझं कोणीच ऐकणार नाही. आजपर्यंत कोणीच तुम्हाला हात लावला नाही. मग मी कशी तुम्हाला मारू शकते" असं अंकिता यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. 

Web Title: jyotiraditya scindia supporters and bjp leader clash pro scindia erupted after insult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.