Jyotiraditya Scindia: Video: मराठीत बोलणारे बाबा... युक्रेनमधील विद्यार्थ्यांना ज्योतिरादित्य शिंदेंनी असा दिला धीर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 07:04 PM2022-03-02T19:04:58+5:302022-03-02T19:26:11+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं
नवी दिल्ली - रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी अडकले आहेत. त्यांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारनं ऑपरेशन गंगाची (Operation Ganga) सुरुवात केली आहे. आता ही मोहीम अधिक जलदगतीनं राबवण्यासाटी मोदी सरकारमधील चार मंत्री युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये पोहोचण्याची जबाबदारी दिली आहे. त्यापैकी, नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे रोमानियाच्या बुखारेस्ट येथे पोहोचले असून त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विशेष म्हणजे मराठमोळ्या विद्यार्थ्यांशी मराठी संवाद साधून धीर दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान, त्या ठिकाणी अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी चार केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये जाण्याची योजना ठरली. हे चारही मंत्री विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी समन्वय साधण्याचं काम पार पाडत आहे. ज्योतिरादित्य शिंदे हे बुखारेस्टला पोहोचले असून त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांची आस्थेने विचारपूस केली. येथे, त्यांना पुणे आणि सांगलीतील विद्यार्थीनीही भेटल्या.
Sri @JM_Scindia ji's presence in Romania has given immense confidence to students & their parents in this complex evacuation process
— Tejasvi Surya (@Tejasvi_Surya) March 2, 2022
Thank you Scindia ji for ensuring students receive adequate food & shelter before they are brought back home safe#OperationGangapic.twitter.com/6inQTDRTTt
त्यावेळी, माझं घरच पुण्यात आले, बालेवाडीचा उल्लेख करत विद्यार्थीनीला धीर दिला. काहीही काळजी करू नका, आपल्या जेवणाची सोय झालीय ना, तुम्हा सर्वांना घेऊन आपण मायदेशी जाणार आहोत, असे विश्वास ज्योतिर्रादित्य यांनी दिला. तसेच, सांगलीच्या मुलीशीही मराठीत संवाद साधला. मी तुमच्या सांगलीला निवडणूक प्रचारात आलो होतो, तेथले आमदार कोण आहेत, खासदार कोण आहेत, असे प्रश्न शिंदेंनी त्या मुलीला विचारले. यावेळी, शिंदेंना पाहून अनेकांना मोठा आधार मिळाला.
#WATCH | Civil Aviation Minister Jyotiraditya Scindia interacts with Indian students at Henri Coandă International Airport in Bucharest (Romania). The students are being evacuated and being brought back to India. #OperationGangapic.twitter.com/KStF51un0I
— ANI (@ANI) March 2, 2022
तसेच चंद्रपूरमधील एका विद्यार्थ्याने मी महाराष्ट्राचा असल्याचे सांगताच, मग मराठीतून बोलणारे बाबा... असे म्हणत त्याच्याशी मराठीतून संवाद साधला. तसेच, कुठल्या जिल्ह्यातून आला हेही विचारपूस केली. तसेच, काळजी करू नका, भारत सरकार तुमच्यासोबत आहे, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वासही दिला.
या 4 मंत्र्यांवर जबाबदारी
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य शिंदे, किरण रिजिजू आणि जनरल व्ही.के.सिंह हे युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी समन्वय कार्यासाठी हजर आहेत. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारीही आपात्कालीन बैठक बोलावली होती. यादरम्यान, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि विदेश सचिव हर्षवर्धन श्रृंगला उपस्थित होते. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांना त्या ठिकाणाहून बाहेर काढणं हे आपलं प्राधान्य असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं होतं.