ग्वाल्हेर : मध्य प्रदेशचे मोठे राजघराणे आणि नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वींच काँग्रेस सोडत राज्यासह देशात भूकंप घडविला होता. यामुळे तेथील कमलनाथ सरकार खेळातील पत्त्याप्रमाणे कोसळले होते. आता लॉकडाऊनमध्ये पुन्हा मध्य प्रदेशचे राजकीय वातावरण तापले आहे. भाजपा सरकारमध्ये मानाच्या जागा न मिळाल्यावरून नाराज असल्याने पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
ज्योतिरादित्य शिंदे दोनच महिन्यात भाजपा सोडणार आहेत? भाजपामध्ये खरेच त्यांचा मुखभंग करण्यात आला आहे? यावर चर्चा झडत असताना खुद्द ज्योतिरादित्यांनीही काहीच प्रतिक्रिया न दिल्याने चर्चांना आणखीनच उत आला आहे. शिंदे यांच्या काँग्रेसच्या घरवापसीवरून जी चर्चा सुरु झाली ती एका ट्विटमुळे. एका न्यूज चॅनलच्या नावाने असलेल्या अनधिकृत खात्यावरून हे ट्विट करण्यात आले होते. यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे हे मध्यप्रदेश सरकारच्या नव्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये समर्थकांना योग्य स्थान दिले नसल्याने नाराज आहेत. त्यांनाही केंद्रीय नेतृत्वाने मंत्रीपद देण्याचा शब्द दिला होता, दोन महिने होत आले तरीही तो पूर्ण केला नाहीय. यामुळे नाराज शिंदे लवकरच भाजप सोडून काँग्रेसमध्ये परतू शकता, असे म्हटले गेले होते.
या एका ट्विटने मध्य प्रदेशच्या राजकीय वर्तुळाच खळबळ उडाली आणि सोशल मिडीयावर कमालीचे व्हायरल होऊ लागले. काही तासांतच हे ट्विट १२ हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिवराज सिंहांनी फसविल्याचे या ट्विटद्वारे स्पष्ट होत असल्याने थेट दिल्लीला खबर गेली. यानंतर पुन्हा शिवराज सिंह सरकारच्या भविष्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले, काहींनी काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार असल्याचे भाकित करून टाकले.
चुकले कुठे?ट्विटरवर अनेक एकाच नावाची खाती असतात. मात्र, त्याची सत्यता पडताळण्यासाठी त्याच्यामागे बरोबर चिन्हाची निळ्या रंगातील टिक असते. ती या खात्यावर नव्हती. लोकांनी याकडे लक्ष दिले नाही. या अकाऊंटच्या फोटोमध्ये स्पष्ट लिहिले होते, की हे एका न्यूज चॅनलचे बनावट अकाऊंट आहे.
ज्योतिरादित्य शिंदेंबाबत अन्य बातम्या...
'बंडखोरी'ला मोठा इतिहास; ज्योतिरादित्यांच्या आजीनेही काँग्रेस सरकार पाडलेलेआणीबाणीने कुटुंब फोडलेले, ज्योतिरादित्य सिंधियांनी जोडलेले
अन्य महत्वाच्या बातम्या...
Pok बाबत पाकिस्तानचा मोठा निर्णय; राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी दिली मंजुरी
LockDown 4.0 : आज जे घडणार आहे, आपला देश कधीही विसरणार नाही
Lockdown: अज्ञात व्यक्ती देवदूत बनून आला; चार गरजूंचे लाखोंचे कर्ज फेडले