नवी दिल्लीः ज्योतिरादित्य शिंदे भाजपामध्ये दाखल झाल्यानंतर काँग्रेसला जोरदार झटका मिळाला. काँग्रेसचंमध्य प्रदेशातील सरकार कोसळलं अन् तिकडे पुन्हा एकदा भाजपाच्या शिवराज सिंह चौहान यांचं सरकार आलं. ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपाकडून राज्यसभेवरही पाठवण्यात आलं आहे. तसेच लवकरच त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे. मध्य प्रदेशात भाजपाच्या नेत्यांची भेट घेतल्यानंतर आणि राज्यसभेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते पुन्हा दिल्लीला परतले होते.कोरोनाच्या संकटात ते सोशल मीडिया आणि फोनच्या माध्यमातून लोकांना मदत करत आहेत. विशेष म्हणजे ते १ जून रोजी भोपाळला परतणार असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला शिंदे समर्थक महेंद्रसिंह सिसोदिया यांनी ही माहिती दिली आहे, ते म्हणाले, महाराज भोपाळला येत असल्याची माहिती मिळाली आहे. शिंदे पुन्हा एकदा भोपाळच्या राजकारणात सक्रिय होणार असल्यानं कॉंग्रेसच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. दोन दिवसांत 200हून अधिक कॉंग्रेस कार्यकर्ते पक्ष सोडून भाजपामध्ये दाखल झाले आहेत. ही केवळ एक सुरुवात आहे, असा दावा माजी मंत्री महेंद्रसिंग सिसोदिया यांनी केला आहे.
हेही वाचा
CoronaVirus : चिनी राष्ट्रपतींच्या पत्नीचं WHOशी काय आहे कनेक्शन?; संकटात येणार संघटना
CoronaVirus News: “खोदा पहाड और...."; मोदींच्या पॅकेजमधून घोर निराशा- पृथ्वीराज चव्हाण
Curfew Extend: 'या' राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये ३० जूनपर्यंत वाढवला कर्फ्यू
देशातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी, योगी अन् नितीश; राहुल, रामदेव पिछाडीवर