नवी दिल्ली : होळीच्या दिवशीच मध्य प्रदेशमध्ये कोमेजलेल्या भाजपामध्ये उत्साहाचे भरते आले होते. कारण काँग्रेसचे मोठे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. याचबरोबर 21 आमदारांनीही विधानसभाध्यक्षांकडे राजीनामा पाठवून दिल्याने काँग्रेस अल्पमतात आली आहे.
येत्या 16 तारखेला विधानसभेचे अधिवेशन आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकप्रमाणे मध्य प्रदेशातही सत्तानाट्य रंगले आहे. महत्वाचे म्हणजे काँग्रेसचे बंडखोर आमदार बेंगळुरुमधीलच हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. तर अन्य़ एका आमदाराने कालच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एवढ्या राजकीय घडामोडी घडलेल्या असूनही काँग्रेस बहुमताचा आकडा गाठण्याचा दावा करत आहे.
या घडामोडींमध्ये ज्योतिरादित्य शिंदे आजच, दुपारी 12.30 वाजता भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. सावधगिरी म्हणून भाजपाने त्यांचे आमदार गुडगावला आयटीसी ग्रँड भारत या हॉटेलमध्ये ठेवले आहेत. तर काँग्रेसनेही काल सायंकाळी त्यांचे उर्वरित आमदारांना राजस्थान जयपूरला हलविले आहे.
सिंधियांनी राजीनाम्याचे पत्र काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना ट्विटरवर पोस्ट केले. हे पत्र न स्वीकारताच काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल यांनी सिंधियांनी पक्ष विरोधी कारवाया केल्यामुळे पक्षाने त्यांची हकालपट्टी केल्याचे जाहीर केले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ज्योतिरादित्य सिंधियांच्या हकालपट्टीवर मंजुरी दिली असून तात्काळ प्रभावाने त्यांना पक्षातून काढून टाकण्यात येत आहे, असे ते म्हणाले.
ज्योतिरादित्य शिंदेंना गेल्या काही महिन्यांपासून राहुल गांधींना भेटायचे होते, पण...ज्योतिरादित्य यांच्या बंडामुळे मध्य प्रदेश सरकार धोक्यात; सपा-बसपाचे सदस्यही भाजपच्या तंबूत
'बंडखोरी'ला मोठा इतिहास; ज्योतिरादित्यांच्या आजीनेही काँग्रेस सरकार पाडलेले
राजीनामा नाही, काँग्रेसने हकालपट्टी केली; ज्योतिरादित्यांवर ठेवला गंभीर आरोप
...म्हणून आजचा दिवस ज्योतिरादित्य सिंधियांसाठी खास; लवकरच धरणार भाजपचा 'हात'
आणीबाणीने कुटुंब फोडलेले, ज्योतिरादित्य सिंधिया आज जोडणार; राजमातेचे स्वप्न पूर्ण करणार