चंबलच्या खोऱ्यात ज्योतिरादित्य शिंदेंचा काँग्रेसला मोठा झटका; आधी माजी आमदार, नंतर २२८ पदाधिकारी फोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 12:01 PM2024-01-24T12:01:36+5:302024-01-24T12:01:57+5:30
काँग्रेसच्या छोट्या मोठ्या अशा २२८ नेत्यांना भाजपात प्रवेश देत उरला सुरला पक्षही संपविण्यास सुरुवात केली आहे.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी मध्य प्रदेशमध्ये चंबलच्या खोऱ्यात पुन्हा एकदा काँग्रेसला जोरका झटका दिला आहे. काँग्रेसच्या छोट्या मोठ्या अशा २२८ नेत्यांना भाजपात प्रवेश देत उरला सुरला पक्षही संपविण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे यांनी काँग्रेसचे माजी आमदार राकेश मावई यांना भाजपात आणले होते. आता त्यांच्या नेतृत्वातील नेत्यांना आणले आहे.
मुरैना विधानसभेचे काँग्रेसचे आमदार राहिलेले राकेश मवई पक्षात नाराज होते. विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापले गेले होते. यामुळे त्यांनी निवडणुका झाल्यानंतर भाजपात प्रवेश केला आहे. शिंदे यांच्यासोबत दिल्लीत गेले आणि भाजपात प्रवेश केला होता. यानंतर मुरैनामध्ये येत शिंदे यांनी मुरैनातील २२८ पदाधिकाऱ्यांना भाजपची वाट धरायला लावली.
भाजपमध्ये दाखल झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये मुरैना महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजू शर्मा, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष हसनैन खान, बनमोर ब्लॉकचे सर्व मंडल अध्यक्ष, मुरैना दक्षिण आणि 15 सेक्टर आणि मुरैना उत्तर आणि जिल्ह्यातील 7 विभागांचे सेक्टर अध्यक्ष आहेत. विधानसभेनंतर त्यांच पक्ष प्रवेश होत असला तरी लोकसभेसाठी हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे.