शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
2
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
4
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
6
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
7
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
8
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
9
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
10
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
11
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
12
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
13
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
14
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
15
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
17
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
18
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
19
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
20
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया

ज्योतिरादित्य यांच्या बंडामुळे मध्य प्रदेश सरकार धोक्यात; सपा-बसपाचे सदस्यही भाजपच्या तंबूत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 1:04 AM

MP Political Crisis: ‘पक्षात राहून जनतेची सेवा करणे अशक्य होत असल्यानेच पुढचे पाऊल उचलण्याची वेळ आली आहे,’ असे शिंदे यांनी ९ मार्चला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिलेल्या राजीनामापत्रात नमूद केले आहे.

भोपाळ : काठावरचे बहुमत मिळवत साधारण सव्वा वर्षापूर्वी सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारमधील २२ आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड करत राजीनामे दिल्याने कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात गेले आहे. राज्यपालांच्या कार्यालयाने १९ आमदारांचे राजीनामे मिळाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. सरकार अल्पमतात गेल्याने काय पावले उचलायची, यावर काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत चर्चा झाल्यावर कमलनाथ यांनी सरकारला धोका नसल्याचा दावा केला.

शिंदे लवकरच समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांना भाजपतर्फे राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची आणि केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशातील काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मंगळवारी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. मात्र त्यांचा राजीनामा न स्वीकारता काँग्रेसने पक्षविरोधी कारवायांबद्दल त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे जाहीर केले. मोदी, शहा यांची भेट आणि काँग्रेसच्या राजीनाम्यानंतर ‘हॅप्पी होली’ एवढीच प्रतिक्रिया देत ज्योतिरादित्य यांनी अधिक बोलणे टाळले. त्यांचे वडील माधवराव शिंदे यांची मंगळवारी पुण्यतिथी होती. त्यानंतर लागोपाठ घडलेल्या नाट्यपूर्ण घडामोडींत बंगळुरू मुक्कामी असलेल्या त्यांच्या समर्थक आमदारांपैकी २२ जणांनी राजीनामे दिले. यात कमलनाथ सरकारमधील सहा मंत्र्यांचाही समावेश आहे. त्यामुळे मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकार कोसळणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. राजीनामा देणाऱ्या आमदारांची संख्या ३० पर्यंत जाईल, असा दावा भाजपच्या नेत्यांनी केला आहे. कमलनाथ भाजपचे आमदार फोडतील, या भीतीपोटी रात्री पक्षाने आपल्या सर्व आमदारांना दिल्लीत हलविले.

‘पक्षात राहून जनतेची सेवा करणे अशक्य होत असल्यानेच पुढचे पाऊल उचलण्याची वेळ आली आहे,’ असे शिंदे यांनी ९ मार्चला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिलेल्या राजीनामापत्रात नमूद केले आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कमलनाथ सिंह यांनी मंगळवारी राज्यपाल लालजी टंडन यांना पत्र लिहून पक्षातून निलंबित करण्यात आलेल्या शिंदे यांच्या गटातील इमरती देवी, तुळसी सिलावट, गोविंदसिंग राजपूत, महेंद्रसिंग सिसोदिया, प्रद्युम्नसिंग तोमर आणि प्रभुराम चौधरी अशा सहा मंत्र्यांना त्वरित हटवण्याची मागणी केली आहे.

‘त्या’ आमदारांना पुन्हा संधी?मध्य प्रदेशातील काँगे्रसचे सरकार पाडण्यापेक्षा ते अंतर्गत विरोधामुळे, त्या पक्षातील सत्तासंघर्ष आणि कुरघोडीमुळे कोसळले तर त्याचा ठपका भाजपवर येणार नाही, अशी खेळी भाजप नेत्यांनी खेळली. सध्या २२ आमदारांच्या राजीनाम्यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात गेले आहे. त्यामुळे सभागृहात बहुमत सिद्ध न करता ते कोसळेल. सध्या राजीनामा दिलेल्या २२ आमदारांना कर्नाटकप्रमाणे पोटनिवडणुकीत पुन्हा संधी दिली जाणार असल्याचे सांगितले जाते.

भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोषकाँग्रेसचे सरकार कोसळणार असल्याचे स्पष्ट होताच मध्य प्रदेशातील भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार धुळवड साजरी केली. आता ‘दिवाळी लवकरच’ अशी प्रतिक्रियाही तेथील नेत्यांनी दिली. 

असे आहे सत्तेचे गणित...मध्य प्रदेश विधानसभेतील सदस्यांची संख्या २३० आहे. त्यापैकी दोन आमदारांचे निधन झाले आहे. त्यामुळे ही संख्या २२८ आहे. काँग्रेसकडे ९४ आमदारांचे संख्याबळ होते. छोटे पक्ष- अपक्षांच्या पाठिंब्याच्या जोरावर ती संख्या ११५ झाली आणि काँग्रेसने सहज बहुमत सिद्ध केले होते. त्यानंतरही सहा आमदारांनी या सरकारला पाठिंबा दिला होता. त्यामुळे काँग्रेस आघाडीचे संख्याबळ १२१ वर पोहोचले. या राज्यात भाजपकडे १०७ आमदार होते.सत्तास्थापनेसाठी त्यांना आठ आमदार कमी पडल्याने त्यांना विरोधी पक्षात बसावे लागले. आता काँग्रेसच्या २२ आमदारांचे राजीनामे मंजूर झाल्याने विधानसभेतील सदस्यांची संख्या २०६ होईल. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यासाठी १०५ आमदारांची गरज आहे. भाजपकडे स्वत:चे १०७ आमदार असल्याने राज्यपालांचे आमंत्रण मिळताच तो पक्ष विधानसभेत सहज बहुमत सिद्ध करू शकेल.वडिलांचाच गिरवला कित्ता : ज्योतिरादित्य यांचे भाजपात स्वागत करत आत्या यशोधराराजे यांनी ही घरवापसी असल्याचे म्हटले. ज्योतिरादित्य यांच्या आजी राजमाता विजयाराजे शिंदे यांनी काँग्रेस सोडून जनसंघाची कास धरली होती, तर वडील माधवराव शिंदे यांनीही काही काळ काँग्रेस सोडून स्वत:चा पक्ष स्थापन केला होता. ज्योतिरादित्य यांनी काँग्रेस सोडताच त्यांचा मुलगा महाआर्यमान याने मला वडिलांचा अभिमान आहे, असे ट्विट केले आहे.

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेBJPभाजपाcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश