जेव्हा राज्यसभेत 'आमने-सामने' आले दिग्विजय सिंह अन् ज्योतिरादित्य शिंदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 02:53 PM2020-07-22T14:53:03+5:302020-07-22T14:59:05+5:30
राज्यसभेत एक गमतीशीर प्रसंगही पाहायला मिळाला. सर्व खासदार शपथ घेत असताना, अचानक ज्योतिरादित्य शिंदे आणि दिग्विजय सिंह आमने-सामने आले. अन्...
नवी दिल्ली - राज्यसभेत आज 45 नव्याने निवडून आलेल्या सदस्यांनी शपथ घेतली. यांपैकी 36 खासदार तर प्रथमच राज्यसभेत पोहोचले आहेत. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत 20 राज्यांतून 61 सदस्य नवडून आले आहेत. यांपैकी 45 जणांनी शपथ घेतली. यात शरद पवार, दिग्विजय सिंह आणि रामदास अठवले यांच्यासह 12 सिटिंग खासदारांचाही समावेश होता. काँग्रेसचा हात सोडून भाजपाचे कमळ हातात घेतलेल्या ज्योतिरादित्य शंदे यांनीही राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली.
यावेळी राज्यसभेत एक गमतीशीर प्रसंगही पाहायला मिळाला. सर्व खासदार शपथ घेत असताना, अचानक ज्योतिरादित्य शिंदे आणि दिग्विजय सिंह आमने-सामने आले. या दोघांनीही मास्क लावलेले होते. जेव्हा शिंदे आणि दिग्विजय सिंह यांचा सामना झाला. तेव्हा त्यांनी एक-मेकांना हात जोडून अभिवादनही केले.
हे दोन्ही नेते जेव्हा एकमेकांचे अभिवादन करत होते. तेव्हा तेथे राज्यसभेचे विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेस खासदार गुलाम नबी आझाददेखील उपस्थित होते. यावेळी गुलाम नबी आझाददेखील हाताने काही इशारा करत असल्याचे दिसून आले.
शिंदे आणि दिग्विजय सिंह ये दोघेही एकाच राज्यातील म्हणजे मध्यप्रदेशातील आहेत. याच वर्षाच्या मार्च महिन्यात जेव्हा शिंदे कमलनाथ सरकारविरोधात उभे राहिले, तेव्हा दिग्विजय सिंहानी उघडपणे कमलनाथांचे समर्थन केले होते. राज्यसभेची एक जागा, हेदेखील शिंदेंनी काँग्रेससोबत केलेल्या बंडखोरीचे कारण होते. याच जागेवर दिग्वीजय सिंह निवडून आले आहेत. राज्यसभेच्या या जागेसाठी आपले नाव घोषित व्हावे अशी शिंदेंची इच्छा होती. मात्र, काँग्रेसने दिग्विजय सिंहांना महत्व दिले. यामुळेदेखील शिंदे नाराज झाले होते.
याच पार्श्वभूमीवर होळीचा मुहूर्त साधत ज्योतिरादित्य शिंदे यांनी मोठी खेळी खेळत समर्थक आमदारांसह भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. शिंदेच्या या निर्णयामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आले आणि भाजपाने मध्यप्रदेशात सरकार स्थापन केले. यानंतर भाजपाने शिंदेंना राज्य सभेवर पाठवले आणि त्यांच्या सहकारी आमदारांना शिवराज सिंह चौहान सरकारच्या कॅबिनेटमध्ये चांगली पदेही दिली.
महत्त्वाच्या बातम्या -
CoronaVirus : अमेरिकेनं तयार केली कोरोनावरील व्हॅक्सीन? ट्रम्प यांचा मोठा दावा!
'या' वर्षी कोरोना लस येणार का?; खुद्द ऑक्सफर्डच्या डेव्हलपर्सनी दिले मोठे 'अपडेट'
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर
CoronaVirus : मानवी चाचणीच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत 'या' लसी; जाणून घ्या, केव्हापर्यंत होणार तयार?
आई शप्पथ!...रशियातील काही उद्योगपती, नेत्यांनी एप्रिलमध्येच घेतली कोरोनावरील लस