- शीलेश शर्मा नवी दिल्ली : बँकांना लुटून विदेशात पलायन केलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्यावरून उठलेले वादळ आणखी वेगवान होत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विजय मल्ल्यावरून नरेंद्र मोदी सरकारवर शनिवारीही हल्लाबोल सुरूच ठेवला असून, पंतप्रधानांच्या आवडत्या अधिकाऱ्याने मल्ल्याविरोधातील लूकआऊट नोटीस कमजोर करून ती इन्फर्मेशन नोटीसमध्ये बदलली, असा आरोप केला आहे.राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवरून म्हटले आहे की, सीबीआयचे माजी संयुक्त संचालक ए. के. शर्मा यांनी मल्ल्याच्या विरोधातील लूकआऊट नोटीस कमजोर केल्यामुळे मल्ल्या देशाबाहेर पलायन करण्यात यशस्वी झाला. शर्मा हे गुजरात केडरचे माजी आयपीएस अधिकारी आहेत व ते सीबीआयमध्ये पंतप्रधानांचे फारच आवडते अधिकारी आहेत. मोदींच्याच शिफारशीवरून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. याच अधिकाºयाकडे नीरव मोदी व मेहुल चोकसीच्या पलायनाची योजना तयार करण्याची प्रमुख जबाबदारी होती, असा आरोपही त्यांनी केला. जेटली यांच्यानंतर राहुल गांधी यांनी शर्मा यांच्या नावाचा पर्दाफाश केला.
ए. के. शर्मांनी केली मल्ल्याची लूकआऊट नोटीस कमजोर : राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 1:21 AM