शहरं
Join us  
Trending Stories
1
निज्जर हत्याकांडात अमित शाह यांचे नाव? कॅनडाची अजित डोवालांसोबत सिक्रेट मिटिंग, दाव्याने खळबळ
2
आता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर मुनव्वर फारुकी; समोर आली धक्कादायक माहिती
3
Medicine Price Hike: जीवनावश्यक औषधं महागणार; ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकते किंमत, NPPA नं दिली मंजुरी
4
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; दोघांमध्ये दोन तास चर्चा 
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आज तारखा होणार जाहीर
6
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी मर्डर केस : गोळीबारात जखमी झालेल्या टेलरने सांगितलं ५ मिनिटांत काय घडलं?
7
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमानला अतिरिक्त सुरक्षा; शुटिंगचे ठिकाण, फार्महाऊसवर नजर
8
लोणकर बंधूंकडून शूटर्सला पैशांचा पुरवठा, शस्त्रही दिले; पुण्याच्या डेअरीत बसून केले प्लॅनिंग
9
बाबा सिद्दिकी वांद्र्यातील रिअल इस्टेट किंग कसे बनले? असा सुरू झाला होता प्रवास
10
मी अल्पवयीन म्हणणारा निघाला २१ वर्षांचा! न्यायाधीशांच्या घरी भरले कोर्ट 
11
Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निकालानंतर Reliance Industries मध्ये घसरण
12
शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू
13
बिश्नोई गँगवरुन कॅनडा पोलिसांचे गंभीर आरोप; म्हणाले, "भारताचे गुप्तहेर..."
14
भाजपाची ५० उमेदवारांची पहिली यादी तयार; महायुतीत ५८ जागांवर चर्चा अद्याप बाकी
15
अखिलेश यादव महाराष्ट्रात, राष्ट्रवादी-ओवेसींच्या गडांना फटका बसणार; सपाचा हा आहे प्लॅन...
16
महायुतीच्या 7 जणांना आमदारकीचे गिफ्ट; भाजपला 3, तर शिंदेसेना आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 2 जागा
17
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
18
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
19
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश

काँग्रेसने गुजरातमधील ४४ आमदारांना बंगळुरूला हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 1:49 AM

गुजरातमध्ये ८ आॅगस्ट रोजी होणाºया राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या ४४ आमदारांना भाजपाच्या ‘शिकारी’पासून वाचविण्यासाठी

अहमदाबाद : गुजरातमध्ये ८ आॅगस्ट रोजी होणाºया राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या ४४ आमदारांना भाजपाच्या ‘शिकारी’पासून वाचविण्यासाठी बंगळुरूत हलविले आहे. गेल्या दोन दिवसांत काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामा दिला असून, त्यातील तीन भाजपात दाखल झाले आहेत.काँग्रेसचे नेते अहमद पटेल गुजरातमधून राज्यसभा निवडणूक लढवीत आहेत. पक्षाच्या ५७ पैकी ६ आमदारांनी राजीनामा दिल्याने संकट उभे ठाकले आहे. काँग्रेसचे महासचिव निशित व्यास म्हणाले की, ४४ आमदारांना बंगळुुरूला हलविले आहे. व्यास या आमदारांसोबत आहेत. सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले आहे. या आमदारांना धमक्या दिल्या जात आहेत, असेही ते म्हणाले.मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी काँग्रेसचा हा आरोप खोडून काढताना हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. आमचा याच्याशी संबंध नाही, असा दावा केला. (वृत्तसंस्था)पटेल जिंकणार नाहीत?राज्यसभा निवडणुकीपूर्वीच काँगे्रसच्या सहा आमदारांनी पक्ष सोडला असतानाच काँग्रेसचे एक ज्येष्ठ आमदार आणि शंकरसिंह वाघेला यांचे निकटवर्तीय राघवजी पटेल यांनी म्हटले आहे की, अहमद पटेल यांच्यासाठी निवडणूक जिंकणे कठीण आहे. येत्या काही दिवसांत काँग्रेसचे आणखी २० आमदार पक्ष सोडतील. राघवजी पटेल यांनीही आपण राजीनामा देऊन भाजपात सहभागी होणार असल्याचे सूचित केले.- सात आमदारांच्या एका गटाने मात्र त्यांच्यासोबत बंगळुरूला न जाण्याचा निर्णय घेतला. यात वाघेला आणि त्यांचे पुत्र महेंद्रसिंह वाघेला यांचा समावेश आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने आमदारांना तिथे हलविले आहे.उत्तर प्रदेशात सपाच्या दोन, बसपाच्या एका आमदाराचा राजीनामाउत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीच्या दोन आणि बसपाच्या एका विधान परिषद सदस्याने शनिवारी राजीनामा दिला. सभापती रमेश यादव यांनी सांगितले की, सपाचे आमदार बुक्कल नवाब आणि यशपाल सिंह तसेच बसपाचे ठाकूर जयवीर सिंह यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.भाजपाचे अध्यक्ष अमित शहा हे शनिवारी लखनौ दौºयावर असतानाच तीन सदस्यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह पाच मंत्री सध्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यांना विधानसभा वा परिषदेवर निवडून आणणे गरजेचे आहे. योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, दिनेश शर्मा स्वतंत्र देव सिंह आणि मोहसिन रझा हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत.या घटनाक्रमामुळे आता योगी आदित्यनाथ यांना निवडणूक लढविण्याची गरज पडणार नाही. विधान परिषदेवर ते निवडून येऊ शकतील. अखिलेश यादव यांनी भाजपावर टीका केली आहे. बसपाच्या प्रमुख मायावती म्हणाल्या की, भाजपाला सत्तेच्या रक्ताची चटक लागली आहे. मणिपूर, गोवा, बिहार व आता गुजरातनंतर उत्तर प्रदेश यातून हेच दिसत आहे.काँग्रेसचा आरोपगुजरात राज्य काँग्रेसचे प्रमुख भरत सोळंकी यांनी सांगितले की, भाजपा गलिच्छ राजकारण करत आहे. पैसा आणि सत्तेच्या जोरावर ते आमच्या आमदारांना प्रलोभने दाखवीत आहेत. त्यामुळे आमचे आमदार एकजुटीने बंगळुरूला गेले आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, आमदारांना पैशांच्या जिवावर शिकार करू पाहणाºया भाजपाविरुद्ध निवडणूक आयोगाने फौजदारी खटला दाखल करावा.