जयपूर : उत्तर प्रदेशमधीलडॉक्टर काफिल खान हे राजस्थानमध्ये सुरक्षित राहतील, असे वचन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी दिल्यामुळे ते गुरुवारपासून जयपूर येथे राहण्यासाठी आले आहेत. काफिल खान यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्या (रासुका) अंतर्गत केलेली कारवाई न्यायालयाने पुराव्यांअभावी रद्द केल्याने त्यांची सुटका झालीआहे.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार माझ्यावर आणखी गुन्हे दाखल करून पुन्हा तुरुंगात रवानगी करेल, अशी भीती डॉ. काफिल खान यांनी व्यक्त केली होती. अलिगढ मुस्लिम विद्यापीठामध्ये २९ जानेवारी रोजी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात डॉ. काफिल खान यांनी केलेल्या भाषणामुळे उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना रासुकाअंतर्गत केलेली अटक अलाहाबाद उच्च न्यायालयाने नुुकतीच रद्दकेली. प्रियांका गांधी या माझ्या आईशी व पत्नीशी राजस्थानमधील सुरक्षित मुक्कामाबाबत बोलल्या आहेत, असे डॉ. काफिल खान म्हणाले.निलंबन रद्द कराडॉ. काफिल खान यांनी सांगितले की, योगी आदित्यनाथ यांनी माझ्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करावी व मला पुन्हा कामावर रुजू होऊ द्यावे. त्यामुळे कोरोनाविरुद्धच्या मुकाबल्यात डॉक्टर म्हणून मला योगदान देता येईल. माझे निलंबन रद्द न झाल्यास मी पुन्हा उच्च न्यायालयामध्ये दाद मागेन.
प्रियांका यांच्या आश्वासनामुळे काफिल राजस्थानात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 4:05 AM