ऑनलाइऩ लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या घरात चोरीची घटना समोर आली आहे. कैलाश सत्यार्थी यांचा नोबेल पुरस्कारही चोरांनी पळवला आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली.
दिल्लीतील कालका जी परिसरातील कैलाश कॉलोनीमधील अरावली अपार्टमेंटमध्ये सत्यार्थींचं घर आहे. त्यावेळी सत्यार्थींच्या घराला टाळं होतं. टाळ फोडून चोरांनी घरातील दागिने आणि रोख रोकडंही लंपास केली. सत्यार्थी सध्या परदेशात असून पोलिस घटनेची चौकशी करत आहेत.
सन 2014 मध्ये जगात प्रतिष्ठित समजला जाणारा शांततेचा नोबेल पुरस्कार भारतातील बालहक्कांसाठी काम करणाऱ्या कैलाश सत्यार्थी यांना प्रदान करण्यात आला होता.
सर रविंद्रनाथ टागोर यांचाही नोबेल पुरस्कार सन 2004 मध्ये चोरीला गेला होता. पश्चिम बंगाल येथील विश्व भारती युनिव्हर्सीटीतून त्याचा नोबेल पुरस्कार चोरीला गेला होता. 1913 मध्ये त्यांचा नोबेल पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.