नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घ़डत आहेत. अशीच एक मन सुन्न करणारी घटना आता समोर आली आहे. पत्नीचा जीव वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या एका पतीवरच काळाने झडप घातली आहे. पत्नीची औषधं आणायला गेलेल्या वृद्धाचा दुर्दैवी अंत झाला आहे. बलबीर सिंह नावाच्या 60 वर्षीय व्यक्तीचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हा वृद्ध ट्रॅक्टरवरुन अचानक खाली पडतो आणि यानंतर ट्रॅक्टर आणि ट्रॉली दोन्ही त्यांच्या अंगावरुन पुढे निघून जातात. ट्रॅक्टर चालक ब्रेक लावला होता. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार. बलबीर सिंह असे मृत वृद्धाचे नाव आहे. ते थाना या गावचे रहिवासी होते. त्यांचे वय 60 वर्ष होते. आपलं गाव थाना येथून कैथल येथे आपल्या पत्नीसाठी काही औषधं घेण्यासाठी आले होते. यानंतर परत आपल्या गावी जाताना त्यांनी कैथल शहरातील पिहोवा चौक येथून गावी जाण्यासाठी एका ट्रॅक्टर चालकाला विनंती केली. यानंतर ते ट्रॅक्टरवर आपल्या गावाकडे निघाले होते.
अंबाला रस्त्यावरील कीया कार एजेंसी जवळ ते पोहोचले. यावेळी अचानक बलबीर सिंह बेशुद्ध झाले आणि ट्रॅक्टरवरुन खाली पडले. यानंतर ट्रॅक्टर आणि ट्राली दोन्ही त्यांच्या अंगावरुन गेले. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृताच्या नातेवाईकांनी कैथल शहर पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
करनालमध्ये भीषण अपघात, तिघांचा मृत्यू
हरियाणाच्या करनाल गावाच्या सोंकडा जवळ रस्त्यावर भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसऱ्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये पती, पत्नी आणि पत्नीची बहीण होती. शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला आहे. तर नातेवाईकांच्या तक्रारीवर वाहनचालक गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.