हरियाणाच्या कैथलमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. करोडपती भावंडातील दोन लहान भाऊ-बहीण अत्यंत वाईत अवस्थेत जीवन जगत आहेत. एका वृद्ध आजारी बहिणीची काळजी घेण्यासाठी भावाला नोकरी सोडावी लागली तेव्हा परिस्थिती आणखीनच बिकट झाली. दोघांकडे जेवणासाठीही पैसे नाहीत.
भाऊ-बहिणीच्या निखळ प्रेमाचे प्रतिक म्हणजे रक्षाबंधन. हे नाते अतूट आहे. अशीच एक भावंडांची कहाणी कैथलमधून समोर आली आहे, जी या नात्याचे दोन्ही पैलू सांगत आहे. एकीकडे आपल्या आजारी वृद्ध बहिणीची काळजी घेण्यासाठी एका भावाने नोकरी सोडली, तर दुसरीकडे त्याच्या करोडपती भावंडांनी आजपर्यंत त्यांची काळजी घेतली नाही.
कैथलमध्ये राहणाऱ्या विजय आणि कृष्णा यांची ही गोष्ट आहे. या दोघांना सहा भाऊ आणि तीन बहिणी असून ते करोडपती आहेत. पण विजय आणि कृष्ण एका मोडक्या वाड्यात अत्यंत वाईट जीवन जगत आहेत. ही महिला इतकी वृद्ध आणि आजारी आहे की, पूजा नावाच्या महिलेने तिची काळजी घेतली तेव्हा तिच्या अंगावर किडे चालत होते. अस्वच्छता पसरली होती. खायला काहीच नव्हतं.
दयनीय अवस्था पाहून सगळेच हैराण
विजय आणि कृष्णा यांची दयनीय अवस्था पाहून सगळेच हैराण झाले. पूजाने या दोघांच्या स्थितीचे वर्णन करणारा एक व्हिडीओ बनवला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला, जे पाहून हरियाणाच्या विविध भागातून लोक मदतीसाठी कैथलमध्ये पोहोचले आणि या भाऊ-बहिणींना खूप पाठिंबा मिळाला.
बहिणीसाठी सोडली नोकरी
विजय हा काही वर्षांपूर्वीपर्यंत मारुती कंपनीत काम करत होता, मात्र त्याच्या बहिणीची तब्येत बिघडल्याने तिला तिची काळजी घेण्यासाठी नोकरी सोडावी लागली. करोडपती बंधू-भगिनींनी आजपर्यंत या दोघांची काळजी घेतली नाही. पण समाजातील लोकांनी माणुसकी दाखवली आहे. लोक मदतीसाठी पुढे येत आहेत. घराची साफसफाई केल्यानंतर दोघांसाठी जेवण आणि औषधाची व्यवस्था करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.