नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांचे राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना ८४ व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहताना त्यांच्या सन्मानार्थ रामेश्वरम येथे स्मारक उभारण्याची घोषणा गुरुवारी केली.डॉ. कलाम यांचे जन्मगाव असलेल्या रामेश्वरमचा विकास अमृत शहराच्या रूपात करण्यात येणार असून त्यांचे स्मारक भावी पिढीसाठी प्रेरणास्थान ठरेल,अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.मोदी यांनी वैज्ञानिक समुदाय आणि प्रामुख्याने तरुणांना प्रोत्साहित करताना शून्यातून निर्मिती करणाऱ्या डॉ. कलाम यांच्या कार्यातून प्रेरणा घेत सर्वसामान्यांचे जीवन सुकर करण्यासाठी नवनवीन आविष्कार करण्याचे आवाहन केले. सुरक्षा संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संशोधनाची गरज असलेल्या काही महत्त्वाच्या क्षेत्रांचा उल्लेखही त्यांनी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
कलामांचे स्मारक उभारणार
By admin | Published: October 15, 2015 11:31 PM