ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - वादग्रस्त क्रीडा प्रशासक सुरेश कलमाडी आणि अभय सिंह चौटाला यांची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या आजीवन अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 2010 साली दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तयारीत झालेल्या घोटाळ्यामुळे सुरेश कलमाडी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते, तर इंडियन नॅशनल लोकदलाचे नेते असलेल्या अभयसिंह चौटाला यांच्यावर बेहिशेबी उत्पन्नाप्रकरणी खटला सुरू आहे.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या चेन्नईत झालेल्या सर्वसाधारण सभेत कलमाडी आणि चौटालांची आजीवन अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव आयओएचे संयुक्त सचिव राकेश गुप्ता यांनी ठेवला. त्यानंतर बैठकीस उपस्थित असलेल्या 150 सदस्यांनी एकमताने हा प्रस्ताव पारित केला. अभय चौटाला यांनी याआधी विविध क्रीडा संघटनांवर प्रशासक म्हणून काम पाहिले आहे. तसेच ते सध्या हरयाणा ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आहेत. तर सुरेश कलमाडी हे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत. दरम्यान केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी कलमाडी आणि चौटाला यांच्या निवडीबाबत आश्चर्च व्यक्त केले आहे. "कलमाडी आणि चौटाला यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत. त्यामुळे IOA मधील त्यांच्या नियुक्तीबाबत आम्ही अहवाल मागवला असून, हा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल," असे विजय गोयल यांनी सांगितले.
Suresh Kalmadi and Abhay Chautala appointed life presidents of IOA(Indian Olympic Association)— ANI (@ANI_news) December 27, 2016
Resolution for their appointment was moved by Joint Secy Rakesh Gupta & 150 people who were part of the meeting agreed to it: IOA Sources— ANI (@ANI_news) December 27, 2016
Both(Kalmadi and Chautala) are facing serious corruption charges. We will seek a report and take appropriate action: Vijay Goel— ANI (@ANI_news) December 27, 2016