शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
2
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
3
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
4
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
5
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
6
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
7
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
8
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
9
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
10
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
11
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
12
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
13
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
14
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
15
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
16
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
17
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
18
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
19
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
20
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?

कलराज, नजमा कायम

By admin | Published: July 02, 2016 4:03 AM

अल्पसंख्याक कल्याणमंत्री कलराज मिश्रा आणि नजमा हेपतुल्ला या दोन ज्येष्ठ मंत्र्यांना वगळण्याची शक्यता मावळल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारासोबत फेरबदल करताना अल्पसंख्याक कल्याणमंत्री कलराज मिश्रा आणि नजमा हेपतुल्ला या दोन ज्येष्ठ मंत्र्यांना वगळण्याची शक्यता मावळल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.मे २०१४ मध्येमोदी यांनी मंत्र्यांसाठी वयाची मर्यादा ७५ वर्षे निश्चित केली होती. मिश्रा आणि हेपतुल्ला हे पंच्याहत्तरित असले तरी त्यांना वगळले जाणार नाही. हेपतुल्ला यांनी मागच्या वर्षी एप्रिलमध्येच ७५ व्या वर्षात पर्दापण केले असून, कलराज मिश्रा यांचा आजच (शुक्रवारी) ७५ वा वाढदिवस आहे.जूनच्या मध्यात मोदी यांनी घेतलेल्या बैठकीत मिश्रा यांची प्रशंसा केली होती. कलराजजी यांनी मंत्रालयात एवढे चांगले काम करून वयाची आडकाठी येत नसल्याचे सिद्ध केले, अशा शब्दांत मोदी यांनी त्यांची प्रशंसा केली होती. उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ब्राह्मण आणि दलित समाजाला आकर्षित करण्याच्या कामाला लागले आहे. त्यामुळे कलराज यांचे मंत्रिपद कायम राहील, असे दिसते.वयाच्या ७५ व्या वर्षात पदार्पण केल्यापासून प्रसारमाध्यमे नजमा हेपतुल्ला यांच्या कारकीर्दीवर लिहीत आहेत. जेव्हा-जेव्हा त्या मोदी यांना भेटत त्या-त्यावेळी त्यांच्या निवृत्तीसंदर्भात हसण्यावारी बोलले जायचे. अमेरिकेच्या खाजगी दौऱ्यावर जाण्यासाठी परवानगी घेण्यासाठी त्या पंतप्रधान मोदी यांना अलीकडेच भेटल्या होत्या. त्या काही बोलण्याआधीच मोदी त्यांना म्हणाले की, तुमच्या तीन मुली आणि नातवंडांना भेटण्यासाठी तुम्ही सुटी घ्यायला हवी. मंत्र्यांच्या विदेश दौऱ्याबाबत मोदींची भूमिका कठोर असते. तथापि, कौटुुंबिक स्थितीमुळे नजमा यांचा अपवाद आहे.सूत्रांनुसार ७५ वर्षे वयाची मर्यादा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाखातर फक्त लालकृष्ण अडवाणी यांच्यासाठी घालण्यात आली होती. तथापि, मोदी अडवाणींच्या विरोधात नाहीत. मोदी यांच्या मते मिश्रा आणि नजमा राजकीयदृष्ट्या उपयुक्त असल्याने त्यांचे मंत्रिपद शाबूत राहील.भाजपमध्ये नजमा सर्वांत ज्येष्ठ मुस्लिम नेत्या आहेत. मुख्तार अब्बास नक्वी यांना बढती दिली जाण्याची आणि अल्पसंख्याक समुदायातील आधार भक्कम करण्यासाठी एम.जे. अकबर यांंचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.>रविवारी बैठक; विधानसभा निवडणुकांवर डोळा दुसरीकडे, विजय सांपला हे दलित समाजाचे असल्याने बसपाच्या मतपेढीला सुरुंग लावण्यासाठी त्यांच्यावर पंजाब प्रदेश भाजपची सूत्रे दिली जातील, तसेच दलित नेते प्रदीप तामता यांना अलीकडेच राज्यसभेचे खासदार करण्यात आले आहे. उत्तराखंडातील दलित मतपेढी (वोट बँक) भक्कम करण्यासाठी त्यांचाही केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता आहे.उत्तर प्रदेशातील दलित समाजाच्या नेत्याचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्याचा भाजप नेतृत्वाचा विचार आहे. केंद्र सरकारमध्ये उत्तर प्रदेशचे १३ मंत्री आहेत; परंतु दलित एकही नाही. दलित समाजाला आकर्षित करण्यासाठी भाजपला असे करणे आवश्यक आहे. हे तत्त्व महाराष्ट्रासाठी लागू केल्यास रिपाइं नेते रामदास आठवले यांचीही केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते.नवीन चेहरे :राजवीर सिंह, राघव लखनपाल, अनुप्रिया पटेल, रामेन देका, राजेश सिंह, कर्नल सोनाराम जाट आणि उत्तर प्रदेशातील बहराईच मतदारसंघातील खासदार साध्वी सावित्रीबाई फुले