कल्याण राड्याप्रकरणीही दोषमुक्त
By admin | Published: October 30, 2015 11:54 PM
डोंबिवली : कल्याण रेल्वे स्थानकात परप्रांतीयांना झालेली मारहाण, त्यानंतर राज ठाकरे यांना डोंबिवलीतील मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये झालेली अटक आणि अन्य केसेससंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सबळ पुराव्यांअभावी त्यांना शुक्रवारी दोषमुक्त केले. आघाडी सरकारच्या काळात हे गुन्हे दाखल झाले होते.
डोंबिवली : कल्याण रेल्वे स्थानकात परप्रांतीयांना झालेली मारहाण, त्यानंतर राज ठाकरे यांना डोंबिवलीतील मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये झालेली अटक आणि अन्य केसेससंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सबळ पुराव्यांअभावी त्यांना शुक्रवारी दोषमुक्त केले. आघाडी सरकारच्या काळात हे गुन्हे दाखल झाले होते. ऑक्टोबर २००८ मध्ये रेल्वे परीक्षा देण्यास परप्रांतांतून आलेल्या परीक्षार्थींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करून हुसकावून लावले होते. तेव्हा राज ठाकरे यांनी आळेफाटा येथे कल्याण-डोंबिवलीच्या मनसे कार्यकर्त्यांची बाजू घेताना परप्रांतीयांवर तोंडसुख घेतले होते. राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळ झाली होती. त्यांचा त्यात थेट संबंध नसूनही पोलिसांनी त्यांना का अटक केली, असा प्रतिप्रश्न कोर्टाने सरकारला केला आणि राज यांना दोषमुक्त केले.