शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
2
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
3
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
4
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
5
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
6
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
7
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
8
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
9
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
10
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
11
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
12
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
13
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
14
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
15
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
16
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
17
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
19
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
20
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग

भाजपामध्ये प्रवेश करण्यावर कमलनाथ यांनी सोडलं मौन; म्हणाले, "अशी गोष्ट असेल तर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 5:08 PM

भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेवर कमलनाथ यांची आता पहिली प्रतिक्रिया आली आहे.

भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेवर कमलनाथ यांची आता पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. "जर अशी काही गोष्ट असेल तर मी तुम्हाला सर्वप्रथम सांगेन" असं त्यांनी एबीपी न्यूजला सांगितलं आहे. कमलनाथ हे छिंदवाडा येथील आपला कार्यक्रम सोडून दिल्लीत पोहोचले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 फेब्रुवारीला कमलनाथ आणि त्यांचे पुत्र नकुलनाथ हे देखील भाजपामध्ये प्रवेश करू शकतात. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थकांनी दावा केला की कमलनाथ यांच्यासोबत 10 ते 12 आमदारही काँग्रेस सोडू शकतात. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून काँग्रेस हटवलं आहे. कमलनाथ यांच्या निकटवर्तीय सज्जन वर्मा यांनीही ट्विटर अकाऊंटवरून काँग्रेसचा लोगो काढून टाकला आहे.

याआधीही कमलनाथ हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यांनी ही चर्चा पूर्णपणे फेटाळून लावली होती. नऊ वेळा खासदार, दोन वेळा आमदार, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि मध्य प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष कमलनाथ यांची ओळख दिग्गज नेते म्हणून केली जाते. यावेळी पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवावे, अशी कमलनाथ यांची इच्छा होती, पण तसं होऊ शकले नाही. काँग्रेसने अशोक सिंह यांना उमेदवारी दिली. 

काय म्हणाले दिग्विजय सिंह?

काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना कमलनाथ यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, "ते भाजपामध्ये प्रवेश करू शकत नाहीत. जी व्यक्ती नेहमीच गांधी-नेहरू कुटुंबाच्या पाठीशी उभी राहिली आहे, ती व्यक्ती भाजपामध्ये कशी जाऊ शकते?" दिग्विजय यांनी कमलनाथ यांच्याशी काल रात्रीच चर्चा झाल्याचं सांगितलं. 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण