- हरिश गुप्ता । लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : गुजरातचे विद्यमान अॅडव्होकेट जनरल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू कमल बी. त्रिवेदी यांचे नाव देशाच्या सॉलिसिटर जनरल पदासाठी सरकारच्या विचाराधीन असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ११ वर्षांपूर्वी त्रिवेदी यांना राज्याचे अॅडव्होकेट जनरल नेमले होते/ तेव्हापासून ते त्या पदावर आहेत. सूत्रांनुसार सॉलिसिटर जनरल पदासाठी सरकारने त्रिवेदी यांच्याकडे विचारणा केली आहे, पण गुजरात सोडून दिल्लीला येण्याची तयारी त्यांनी अद्याप कळविलेली नाही.पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्याआधी या नियुक्त्या व्हाव्यात असे सरकारचे प्रयत्न आहेत.अॅटनी जनरल मुकुल रोहटगी यांनी मुदत संपल्यावर फेरनियुक्तीमध्ये रस नसल्याचे कळविल्यानंतर ज्येष्ठ वकील हरीष साळवे यांच्याकडे त्यांची विचारणा करण्यात आली. पण लंडनमधील वकिली सोडून भारतात परतण्याची तयारी त्यांनी कळविलेली नाही. साळवे यांनी नकार दिल्यास विद्यमान सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार यांना अॅटर्नी जनरल म्हणून बढती दिली जाऊ शकते.