नवी दिल्ली: हिंदी पट्ट्यातील तीन राज्यांमध्ये सत्ता स्थापन करताच काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी सुपरफास्ट कारभार सुरू केला आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे. मध्य प्रदेशचेमुख्यमंत्री कमलनाथ आणि छत्तीसगडचेमुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अवघ्या काही तासांमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. सत्तेत आल्यास 10 दिवसांमध्ये कर्जमाफी देऊ, असं आश्वासन काँग्रेसनं दिलं होतं. या आश्वासनाची पूर्तता मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये केली. काँग्रेस मुख्यमंत्र्यांनी गेल्या 24 तासांत घेतलेले महत्त्वाचे निर्णय-1. मध्य प्रदेश- शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ; या निर्णयाचा फायदा 30 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. 2. मध्य प्रदेश- कन्यादान योजनेच्या निधीत भरघोस वाढ; 28 हजाराहून निधी थेट 51 हजारांवर3. मध्य प्रदेश- स्थानिकांना रोजगाराच्या अधिक संधी; नवा उद्योगांमध्ये स्थानिकांना 70 टक्के रोजगार देणं अनिवार्य, अन्यथा अनुदान मिळणार नाही4. छत्तीसगड- 16 लाख 65 हजार शेतकऱ्यांचं 6100 कोटी रुपयांचं कर्ज माफ5. छत्तीसगड- तांदळाला मिळणारा हमीभाव प्रति क्विंटल 2500 रुपयांवर6. छत्तीसगड- झीरम हल्ल्यातील शहिदांना न्याय मिळवून देण्यासाठी एसआयटीची स्थापना7. छत्तीसगड- नक्षलविरोधी अभियानाचे विशेष संचालक डी. एम. अवस्थी यांच्यावर असणारी जबाबदारी वाढवली; त्यांना मुकेश गुप्ता यांच्या जागी एसीबी आणि ईओडब्ल्यूची जबाबदारी देण्यात आली. 8. छत्तीसगड- अशोक जुनेजा यांची गुप्तचर विभागाच्या प्रमुखपदी निवड9. छत्तीसगड- संजय पिल्लई यांची गुप्तचर विभागाच्या विशेष संचालकपदी नियुक्ती; पिल्लई 1968 च्या बॅचचे अधिकारी10. छत्तीसगड- झीरम खोऱ्यातील दुर्घटनेवेळी गुप्तचर विभागाचे महानिरीक्षक असलेल्या मुकेश गुप्ता यांची बदली; गुप्ता यांची रायपूरमधील पोलीस मुख्यालयात बदली
अब की बार सुपरफास्ट कारभार; अवघ्या 24 तासांत काँग्रेस सरकारांचे 10 मोठे निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 10:14 AM