"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 04:13 PM2024-05-06T16:13:13+5:302024-05-06T16:16:06+5:30
Kamalnath And BJP : उत्तर प्रदेशातील अमेठी येथील काँग्रेस कार्यालयाबाहेर गोंधळ आणि तोडफोडीची घटना समोर आली आहे. या संदर्भात मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
उत्तर प्रदेशातील अमेठी येथील काँग्रेस कार्यालयाबाहेर गोंधळ आणि तोडफोडीची घटना समोर आली आहे. याबाबत काँग्रेस सातत्याने भाजपाला धारेवर धरत आहे. या संदर्भात मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. कमलनाथ यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबत पोस्ट केली आणि लिहिलं की, "रविवारी रात्री भाजपा कार्यकर्त्यांनी उत्तर प्रदेशातील अमेठी येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड केली ती अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद आहे."
"या घटनेदरम्यान काँग्रेस कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आणि पोलीस प्रशासन गप्प राहिल्याचंही बोललं जात आहे. अमेठीसारख्या हायप्रोफाईल जागेवर कार्यालयालाही सुरक्षा देऊ शकत नाही, तर संपूर्ण देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका कशा होतील? हे या घटनेवरून स्पष्ट होतं की, आजवर नेत्यांची तोडफोड करणारी भाजपा आता लाठ्या-काठ्यांनी तोडफोड करायला उतरली आहे"
उत्तर प्रदेश के अमेठी में रविवार रात भाजपा कार्यकर्ताओं ने जिस तरह से कांग्रेस पार्टी के कार्यालय पर तोड़फोड़ की वह अत्यंत निंदनीय और शर्मनाक है।
— Kamal Nath (@OfficeOfKNath) May 6, 2024
इस घटना के दौरान कांग्रेस कार्यालय के बाहर खड़ी गाड़ियों के शीशे तोड़ दिए गए और यह भी कहा जा रहा है कि पुलिस प्रशासन मूक दर्शक बना…
उत्तर प्रदेशच्या अमेठीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर वाहनांची तोडफोड आणि गोंधळ झाला. हल्लेखोर दारूच्या नशेत होते, असे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली. या प्रकरणाबाबत काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की, ते कार्यालयात उपस्थित होते. आवाज ऐकून अराजकतावादी तेथून पळून गेले.
त्याचवेळी काँग्रेस नेते याप्रकरणी भाजपावर आरोप करत आहेत. काँग्रेसच्या सोशल मीडिया अध्यक्षा सुप्रिया श्रीनेत आणि युवक काँग्रेसचे नेते श्रीनिवास बीवी यांच्यासह अनेक नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत. ज्यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.