'शेतकरी आंदोलनादरम्यान अनेक हत्या अन् बलात्कार...' कंगना रणौतच्या वक्तव्याने नवा वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 05:55 PM2024-08-25T17:55:35+5:302024-08-25T17:56:33+5:30
Congress On Kangana Ranaut: 'आपले सरकार कमकुवत असते, तर पंजाबचा बांग्लादेश झाला असता.'
Kangana Ranaut : अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार कंगना राणौत आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. तिने शेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद झाला होता. दरम्यान, आता पुन्हा एकदा कंगनाने शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान बलात्कार आणि हत्या झाल्याचा आरोप तिने केला आहे. तिच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
'...तर पंजाबचा बांग्लादेश झाला असता'
दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत कंगना राणौत म्हणाली की, 'आपल्या देशाचे सर्वोच्च नेतृत्व मजबूत नसते, तर या लोकांनी पंजाबला बांग्लादेश बनवले असते. शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली जे काही चालू होते, ते संपूर्ण देश पाहत होता. निषेधाच्या नावाखाली हिंसाचार कसा पसरवला गेला. आंदोलनादरम्यान अनेक माणसे मारली गेली, मृतदेहांना लटकवले गेले, बलात्कार झाले...सरकारने कृषी विधेयक मागे घेताच या साऱ्यांना धक्का बसला. कारण त्यांची प्लॅनिंग खुप मोठी होती. त्यांच्यावर सरकारने वेळीच नियंत्रण मिळवले, अन्यथा ते काहीही करू शकले असते.'
Kangana Ranaut: Bangladesh like anarchy could have happened in India also like in the name of Farmers protest. Outside forces are planning to destroy us with the help of insiders. If it wouldn't have been foresight of our leadership they would have succeded. pic.twitter.com/05vSeN8utW
— Megh Updates 🚨™ (@MeghUpdates) August 25, 2024
पंजाबमधील वास्तव ‘उडता पंजाब’ चित्रपटातही दाखवण्यात आले आहे. सध्या पंजाबमध्ये ड्रग्ज माफिया, धर्मांतर करणाऱ्या टोळ्या आणि फुटीरतावादी खलिस्तान समर्थक फोफावत आहेत. तिथे काही लोक नेहमीच कायदा हातात घेत आहेत, हे योग्य नाही. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. माझ्यावर हल्ला करुन माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत. तिथे जे काही होत आहे, ते योग्य नाही,' असे वक्तव्य कंगनाने केले आहे.
बांग्लादेशातील परिस्थितीवर बॉलिवूड गप्प
बांग्लादेशातील परिस्थितीवर बॉलिवूडमधील कुणीही भाष्य केले नाही. यावर कंगनाने म्हणते की, 'या लोकांना काहीही माहिती नसते. ते फक्त आपल्याच तंद्रीत असतात. सकाळी मेकअप करुन बसतात, देशात किंवा जगात काय चालले आहे, याने त्यांना काही फरक पडत नाही. आपले काम असेच चालू राहावे, देश नरकात गेला तरी चालेल. मात्र, देशाचे काही नुकसान झाले, तर त्यांचेही मोठे नुकसान होईल, हे ते विसरतात,' अशी तीव्र प्रतिक्रिया कंगनाने दिली.
कोलकाता बलात्कारावर म्हणाली...
'महिलांची सुरक्षा हा माझ्यासाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. मी महिलांच्या सुरक्षेबाबत खूप गंभीर आहे आणि महिलांच्या समर्थनार्थ आवाज उठवते. मी आमिर खानच्या 'सत्यमेव जयते' या शोमधून आयटम नंबरलाही विरोध केला होता. एखाद्या महिलेचे शरीर फक्त मनोरंजनासाठी असते का?,' असा सवालही तिने यावेळी उपस्थित केला.
काँग्रेसवर बोचरी टीका
दरम्यान, कंगनाने शेतकरी आंदोलनाविषयी केलेल्या वक्तव्यावरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे. पंजाब काँग्रेसचे नेते राजकुमार वेरका यांनी तर कंगना राणौतवर NSA लागू करण्याची मागणी केली आहे. वेरका म्हणाले, 'कंगना रणौत नेहमी पंजाबच्या नेत्यांबाबत गरळ ओकते. तिने शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हटले, आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. या आरोपांवर भारतीय जनता पक्षाने स्पष्टीकरण द्यावे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी कंगनाच्या विरोधात एफआयआर नोंदवावा,' अशी मागणी त्यांनी केली.