शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहना सिंगची 'गगनचुंबी' झेप! बनली तेजस फायटर फ्लीटमधील पहिली महिला फायटर पायलट
2
'दगडूशेठ'च्या बाप्पांची श्री उमांगमलज रथातून सांगता मिरवणूक उत्साहात; भाविकांची झुंबड
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रावरील शस्त्रक्रिया यशस्वी; दुखापतग्रस्त हाताने खेळलेला 'डायमंड लीग'
4
अमेरिकेच्या प्रतिष्ठित हम्फ्रे फेलोशिप प्रोग्रामसाठी विजयलक्ष्मी बिदरी यांची निवड
5
लेबनॉनमध्ये साखळी बॉम्बस्फोट, 5 जणांचा मृत्यू तर 1200-1500 जखमी; इस्रायलवर संशय
6
अचलपूर तालुक्यात गणेश विसर्जना करण्यासाठी गेलेले दोन कर्मचारी पूर्णा नदीपात्रात गेले वाहून
7
हातगाडी लावण्यावरून चाकू हल्ल्यात एकाचा खून; कोल्हापूरच्या आराम कॉर्नर येथील घटना
8
जळगाव जामोदमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, तरुण जखमी; पोलिसांचा हस्तक्षेप
9
तलावातील पाण्यामध्ये बुडून बाप-लेकाचा मृत्यू; लातूर जिल्ह्यातील माळहिप्परगा येथील घटना
10
गोळ्या झाडून पोलीस कर्मचाऱ्याने केला पत्नीचा खून; किरकोळ वादातून उचललं टोकाचं पाऊल
11
'पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष, जळगावात जल्लोषात विसर्जन अन् सामाजिक संदेश
12
गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत दणदणाट अन् लखलखाट! कोल्हापुरात तुफान धामधूम
13
“बाहेर जाऊन देशाबाबत असे बोलणे शोभत नाहीत, राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा”: रामदास आठवले
14
'मला मेनोपॉझबद्दल वडिलांनी आधीच..' सुधा मूर्तींनी सांगितला मासिक पाळी अन् मेनोपॉझचा अनुभव
15
“भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”: गिरीश महाजन
16
Ganesh Visarjan 2024 Live: पुण्यातील मानाच्या पाचही गणपती बाप्पांचे विसर्जन
17
भारतात वेगाने वाढतीये करोडपतींची संख्या, ₹ 10 कोटी कमावणाऱ्यांच्या संख्येत 63 टक्क्यांनी वाढ
18
अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नोकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी
19
आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार; अजित पवार स्पष्टच बोलले
20
PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...

'शेतकरी आंदोलनादरम्यान अनेक हत्या अन् बलात्कार...' कंगना रणौतच्या वक्तव्याने नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 5:55 PM

Congress On Kangana Ranaut: 'आपले सरकार कमकुवत असते, तर पंजाबचा बांग्लादेश झाला असता.'

Kangana Ranaut : अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदार कंगना राणौत आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. तिने शेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद झाला होता. दरम्यान, आता पुन्हा एकदा कंगनाने शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान बलात्कार आणि हत्या झाल्याचा आरोप तिने केला आहे. तिच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

'...तर पंजाबचा बांग्लादेश झाला असता'दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत कंगना राणौत म्हणाली की, 'आपल्या देशाचे सर्वोच्च नेतृत्व मजबूत नसते, तर या लोकांनी पंजाबला बांग्लादेश बनवले असते. शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली जे काही चालू होते, ते संपूर्ण देश पाहत होता. निषेधाच्या नावाखाली हिंसाचार कसा पसरवला गेला. आंदोलनादरम्यान अनेक माणसे मारली गेली, मृतदेहांना लटकवले गेले, बलात्कार झाले...सरकारने कृषी विधेयक मागे घेताच या साऱ्यांना धक्का बसला. कारण त्यांची प्लॅनिंग खुप मोठी होती. त्यांच्यावर सरकारने वेळीच नियंत्रण मिळवले, अन्यथा ते काहीही करू शकले असते.'

पंजाबमधील वास्तव ‘उडता पंजाब’ चित्रपटातही दाखवण्यात आले आहे. सध्या पंजाबमध्ये ड्रग्ज माफिया, धर्मांतर करणाऱ्या टोळ्या आणि फुटीरतावादी खलिस्तान समर्थक फोफावत आहेत. तिथे काही लोक नेहमीच कायदा हातात घेत आहेत, हे योग्य नाही. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. माझ्यावर हल्ला करुन माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत. तिथे जे काही होत आहे, ते योग्य नाही,' असे वक्तव्य कंगनाने केले आहे.

बांग्लादेशातील परिस्थितीवर बॉलिवूड गप्पबांग्लादेशातील परिस्थितीवर बॉलिवूडमधील कुणीही भाष्य केले नाही. यावर कंगनाने म्हणते की, 'या लोकांना काहीही माहिती नसते. ते फक्त आपल्याच तंद्रीत असतात. सकाळी मेकअप करुन बसतात, देशात किंवा जगात काय चालले आहे, याने त्यांना काही फरक पडत नाही. आपले काम असेच चालू राहावे, देश नरकात गेला तरी चालेल. मात्र, देशाचे काही नुकसान झाले, तर त्यांचेही मोठे नुकसान होईल, हे ते विसरतात,' अशी तीव्र प्रतिक्रिया कंगनाने दिली.

कोलकाता बलात्कारावर म्हणाली...'महिलांची सुरक्षा हा माझ्यासाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. मी महिलांच्या सुरक्षेबाबत खूप गंभीर आहे आणि महिलांच्या समर्थनार्थ आवाज उठवते. मी आमिर खानच्या 'सत्यमेव जयते' या शोमधून आयटम नंबरलाही विरोध केला होता. एखाद्या महिलेचे शरीर फक्त मनोरंजनासाठी असते का?,' असा सवालही तिने यावेळी उपस्थित केला.

काँग्रेसवर बोचरी टीकादरम्यान, कंगनाने शेतकरी आंदोलनाविषयी केलेल्या वक्तव्यावरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे. पंजाब काँग्रेसचे नेते राजकुमार वेरका यांनी तर कंगना राणौतवर NSA लागू करण्याची मागणी केली आहे. वेरका म्हणाले, 'कंगना रणौत नेहमी पंजाबच्या नेत्यांबाबत गरळ ओकते. तिने शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हटले, आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. या आरोपांवर भारतीय जनता पक्षाने स्पष्टीकरण द्यावे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी कंगनाच्या विरोधात एफआयआर नोंदवावा,' अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतFarmers Protestशेतकरी आंदोलनBJPभाजपाcongressकाँग्रेस