अभिनेत्री कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. ६ सप्टेंबरला तो प्रदर्शित होणार नाही. याप्रकरणी त्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. याच दरम्यान कंगनाने आपलं मत व्यक्त केलं आहे. "मी सर्वांचं आवडतं टार्गेट झाली आहे. झोपलेल्या देशाला जागं करण्यासाठी ही किंमत मोजावी लागेल."
कंगना राणौत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याबाबत पोस्ट केली आहे. "आज मी सर्वांचं आवडतं टार्गेट बनली आहे. झोपलेल्या या देशाला जागं करण्यासाठी हीच किंमत मोजावी लागेल. मी कशाबद्दल बोलत आहे हे त्यांना कळत नाही. मी इतकी चिंतित का आहे हे त्यांना कळत नाही, कारण त्यांना शांतता हवी आहे. त्यांना कोणाचीही बाजू घ्यायची नाही. ते कूल आहेत, तुम्हाला माहित आहे की चिल्ड!!"
"सीमेवरील गरीब सैनिकालाही शांत राहण्याचा हाच विशेषाधिकार मिळाला पाहिजे, त्यांना कोणाचीही बाजू घ्यावी लागत नाही आणि त्याने पाकिस्तानी/चिनींना आपलं शत्रू मानलं नाही. त्या तरुणीचा एकच गुन्हा होता की ती रस्त्यावर एकटी होती आणि तिच्यावर बलात्कार झाला होता, ती कदाचित माणुसकीवर प्रेम करणारी सज्जन आणि दयाळू तरुणी असेल, पण हा तिच्या माणुसकीचा बदला घेतला गेला?"
"माझी इच्छा आहे की सर्व लुटारू आणि गुन्हेगारांना देखील या शांत आणि झोपलेल्या पिढीसारखे प्रेम आणि आपुलकी असेल, परंतु जीवनाचे सत्य काही वेगळे आहे. काळजी करू नका ते तुमच्या मागे येत आहेत. जर आमच्यापैकी काही तुमच्यासारखे कूल झाले तर ते तुम्हाला पकडतील आणि मग तुम्हाला अशांत लोकांचं महत्त्व कळेल" असं कंगनाने म्हटलं आहे.