नवी दिल्ली - अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. कंगना सोशल मिडियावर कधी कुणावर निशाणा साधते, तर कधी कुणाच्या सपोर्टमध्येही समोर येते. याच बरोबर ती देशा आणि जगाशी संबंधित मुद्द्यांवरही आपले आपले मत मांडत असते. आता कंगनाने रमजानमध्ये होणाऱ्या भेटीवर निर्बंध घालण्यात यावेत, असे म्हटले आहे. यानंतर काही ट्विटर युझर्स तिला ट्रोलदेखील करत आहेत. (Kangana Ranaut questions ramzan gathering after PM Narendra Modi's appeal to make kumbh mela symbolic)
खरे तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळ्यासंदर्भात ट्विट करत म्हटले आहे, की ' आज आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरीजी यांच्याशी फोनवरून चर्चा झाली. यावेळी सर्व संतांच्या प्रकृतीची चौकशी केली. सर्व संत मंडळी प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करत आहेत. यासाठी मी संत मंडळींचे आभार मानले.'
पंतप्रधान मोदींनी पुढे लिलीहे आहे, की 'मी प्रार्थना केली आहे, की दोन शाही स्नान झाले आहेत. तसेच आता कोरोना संकट लक्षात घेत कुंभ प्रतिकात्मकच ठेवावे. यामुळे या संकटातील लढाईला एक ताकद मिळेल.'
यानंतर कंगना रणौतने पंतप्रधान मोदींना आवाहन करत ट्विट केले होते, की 'माननीय पंतप्रधानजी, मी आपल्याला विनंती करते, की कुंभमेळ्यानंतर रमजानमध्ये होणाऱ्या मिलन समारंभांवरही निर्बंध घालण्यात यावेत.' मात्र काही वेळानंतर तिने हे ट्विट डिलिट केले.
CoronaVirus: चिंताजनक! हवेच्या माध्यमाने वेगाने पसरतो कोरोना; ठोस पुराव्यांसह Lancet चा दावा...!
कंगना राणौतच्या 'थलायवी'वर कोरोनाचे ग्रहण -देशात कोरोना व्हायरसची वाढती संख्या बघून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. परिणामी अनेक बॉलिवूड सिनेमाच्या रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कंगना राणौतचा आगामी सिनेमा 'थलायवी'ची रिलीज डेटही पुढे ढकलण्यात आली आहे. तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ अभिनेत्री जे. जयललिता यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता आणि चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली होती.
मात्र, लॉकडाउनचं सावट तसेच वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आता प्रदर्शन लांबणीवर पडले आहे. 'थलायवी' येत्या 23 एप्रिलला थिएटरमध्ये रिलीज होणार होता. कोरोना व्हायरसच्या पुन्हा एकदा वाढत्या घटनांमुळे पुन्हा थिएटर बंद होण्याची शक्यता आहे आणि लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्मात्यांनी हा निर्णय घेतला असवा. यासंदर्भात निर्मात्यांकडून एक पत्रक जाहीर करण्यात आलं आहे.