मुंबईः लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेली हिंसक झटापट, त्यात भारताच्या 20 जवानांना आलेलं वीरमरण, त्यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर वाढलेला तणाव, चीनची मुजोरी या पार्श्वभूमीवर ड्रॅगनला हिसका दाखवण्याची मागणी देशवासीयांकडून होतेय. त्याचाच भाग म्हणून, चिनी वस्तू न वापरण्याचं आवाहन वेगवेगळ्या माध्यमांमधून करण्यात येतंय. काही प्रसिद्ध व्यक्ती, सेलिब्रिटींनीही या मोहिमेत पुढाकार घेतला आहे.
चीनच्या कारस्थानाला आपण बुलेट आणि वॉलेट अशा दोन्ही माध्यमातून प्रत्युत्तर दिलं पाहिजे, असं मत रिअल लाईफमधील फुन्सूक वांगडू – अर्थात शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ सोनम वांगचूक यांनी व्यक्त केलं आहे. त्याला अनेकांनी पाठिंबाही दिला आहे. त्यात आता बॉलिवूडची ‘क्वीन’, बेधडक नायिका कंगना राणावतनंही ‘एन्ट्री’ घेतलीय.
‘‘कुणी आपला हात किंवा बोटं कापण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला किती वेदना होतात. अगदी तशाच वेदना चीन आपल्याला लडाखमध्ये देतोय. आपल्या सीमांचं रक्षण करताना 20 जवान शहीद झाले. त्या वीरमातांचे अश्रू, वीरपत्नींचा आक्रोश आणि त्यांच्या मुलांनी दिलेलं बलिदान आपण विसरू शकतो का? सीमेवर होणारं युद्ध फक्त लष्कराचं, सरकारचं असतं का? त्यात योगदान देणं जनतेचं कर्तव्य नाही का? चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून आपण चीनविरुद्धच्या या युद्धात सहभागी होऊया आणि भारताला जिंकवूया, असं आवाहन कंगना राणावतनं चाहत्यांना केलं आहे.
इंग्रजांच्या साम्राज्याला हादरा द्यायचा असेल तर त्यांच्या प्रत्येक उत्पादनावर बहिष्कार घाला, असा ‘स्वदेशी’चा नारा महात्मा गांधींनी दिला होता. तो आपण विसरतोय का? लडाख हा फक्त जमिनीचा तुकडा नाही; ते भारताच्या अस्मितेचं प्रतीक आहे. आपण वापरत असलेल्या चिनी वस्तूंमधून चीनला महसूल मिळतो आणि त्यातूनच शस्त्रं खरेदी करून ते आपल्या जवानांवर गोळीबार करतात. मग, चिनी वस्तू वापरून या युद्धात आपण चीनला मदत करणार का?, असे प्रश्न कंगनानं उपस्थित केले आहेत. चिनी सामानाला थारा न देता आपण आत्मनिर्भर होऊया, अशी साद तिनं घातली आहे.
View this post on Instagram"We have to stand together, unite, and collectively fight this war against China!" #अब_चीनी_बंद
A post shared by Kangana Ranaut (@team_kangana_ranaut) on
आणखी वाचाः
बुलेट आणि वॉलेट दोन्हींच्या माध्यमातून चीनवर करावा लागेल हल्ला, सोनम वांगचूक यांचा मोलाचा सल्ला
...तेव्हा वाजपेंयींनी मेंढ्या-बकऱ्यांच्या माध्यमातून घडवली होती चीनला अद्दल
आता चीनच्या पाणबुड्यांचे हिंदी महासागरावर लक्ष; भारतासाठी धोक्याचे
'मोदीजी घाबरू नका, चीननं जमीन बळकावल्याचं सत्य देशवासियांना सांगा'
गलवान, पेंगाँगनंतर आता देपसांगवर चीनचा डोळा, नवा वाद उकरून काढण्याच्या तयारीत ड्रॅगन